आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपामुळे ऑनलाइन कामकाजाचा बोजवारा, १३४ ग्रामपंचायतींची कामे ठप्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंडाळा - वैजापूर तालुक्यातील १३४ ग्रामपंचायतींचे ऑनलाइन कार्यक्रम तीस दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थांची प्रमाणपत्रांसाठी ग्रामपंचायतींवर खेट्या मारण्याची वेळ आली आहे. राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींचे कामकाज ऑनलाइन करण्यासाठी शासनाने २०११ मध्ये संग्राम संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र हा प्रकल्प राबवला होता. ग्रामपंचायतींचा कारभार पारदर्शक व ऑनलाइन करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत महा ऑनलाइन कंपनीमार्फत संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली होती.

वैजापूर तालुक्यातील १३४ ग्रामपंचायतींमध्ये हा प्रकल्प चालू असून यावर सुमारे ११६ संगणक परिचालक कार्यरत आहेत. परंतु त्यांना जिल्हा परिषदेत सामावून घेणे, महाऑनलाइन कंपनीचा करार रद्द करणे, पंधरा हजार रुपये वेतन मंजूर करणे, अशा विविध मागण्यांसाठी परिचालक राज्य संघटनेने २३ मार्चपासून बेमुदत संप पुकारल्याने तीस दिवसांपासून वैजापूर तालुक्यातील १३४ ग्रामपंचायतींचे काम बंद असल्याने कार्यालयातून कोणतेच ऑनलाइन प्रमाणपत्र मिळत नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे.

दहावी व बारावी परीक्षा नुकतीच संपली असून पुढील शिक्षणासाठी उत्पन्न, रहिवासी, जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याने हे प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्रामपंचायतमधून पुराव्याची पूर्तता करावी लागते. परंतु संगणक कक्ष बंद असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. तरी ग्रामपंचायतीने त्वरित प्रमाणपत्रे द्यावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सध्या बँक खाते उघडण्यासाठी व शासकीय कामासाठी ऑनलाइन प्रमाणपत्राशिवाय कोणतेच काम होत नाही. लाइट मीटरसाठी ना हरकत प्रमपाणपत्र लागते. परंतु संगणक कक्ष बंद असल्याने ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने मोठी अडचण झाली आहे.
संग्राम शिरसाट, ग्रामस्थ

कामकाज थांबले
वेतन वाढवणे, जिल्हा परिषदेमध्ये सामावून घेणे या मागण्यांसाठी वैजापूर तालुक्यातील ११६ परिचालक बेमुदत संपावर गेल्याने १३४ ग्रामपंचायतींचे ऑनलाइन काम ठप्प झाले आहे.
पवन थोरात, तालुका समन्वयक, महाऑनलाइन

मागण्या पूर्ण कराव्यात
महा ऑनलाइन कंपनीचा करार रद्द करणे, जिल्हा परिषदेमध्ये संगणक परिचालकांना सामावून घेणे, पंधरा हजार रुपये वेतन मंजूर करावे या मागण्यांनंतर शासन जोपर्यंत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत ऑनलाइनचे काम सुरू होणार नाही.
इम्रान पठाण, संगणक परिचालक
बातम्या आणखी आहेत...