आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातुरात नारींचे प्रबोधन; हुंडा मागणार्‍याशी लग्न करू नका!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

''महिलांवरील वाढत्या आत्याचाराबाबत त्यांना सजग करण्यासाठी आणि महिलांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी लातूर येथील नारी प्रबोधन मंचच्या वतीने शनिवारी सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वडिलोपाजिर्त मालमत्तेत समान वाटा मिळवण्यासाठी दबाव गट निर्माण करण्याबरोबरच हुंडा मागणार्‍यांशी लग्न करू नका, असे आवाहन अँड. वर्षा देशपांडे यांनी केले.

तरुणींना शपथ
अँड. पल्लवी रेणके यांनी हुंडा मागणार्‍या तरुणांशी लग्न करणार नाही, अशी शपथ तरुणींना दिली. तत्पूर्वी शहरातून महिलांनी शोभायात्रा काढली. शोभायात्रेतील महिलांच्य हातात विविध घोषणांचे फलक झळकत होते. त्यामुळे ही शोभायात्रा लक्षवेधक ठरली.

महिला अत्याचारांत महाराष्ट्र दुसरा
महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत जम्मू-काश्मीर एक नंबर तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी आहे. त्यामुळे महाराष्टाला पुरोगामी कसे म्हणावे, असा प्रश्न पडला आहे. मराठवाड्यातील भ्रूणहत्या आणि हुंडाबळीचा प्रकार लाजिरवाणा असून, याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या.

महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत त्यांना सजग करण्यासाठी आणि महिलांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी लातूरच्या नारी प्रबोधन मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना अँड. वर्षा देशपांडे. (दुसर्‍या छायाचित्रात) तत्पूर्वी महिलांनी प्रबोधनात्मक शोभायात्रा काढली. या वेळी सहभागी महिलांनी घोषणांनी शहर दणाणून सोडले.