आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईबाबांच्या पादुका अन्यत्र नेण्यास विराेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- साईबाबांच्या पवित्र आणि अमूल्य चांदीच्या पादुका विश्वस्तांच्या अट्टाहासापायी परगावी परराज्यात नेऊ नये. त्याऐवजी साईरथ बनवून बाहेरच्या राज्यात शंभर दिवसांचे नियोजन करून पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करून बाबांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करावा, अशी मागणी शहरातील काही तरुणांनी संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे सोमवारी केली.
 
चावडी कट्ट्याचे सदस्य प्रमोद गोंदकर, भाऊ भोसले, दत्तात्रय गोंदकर यांनी आज संस्थानला हे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, काही विश्वस्तांचा बाहेर पादुका नेण्याचा अट्टहास प्रयत्न आहे. नुकत्याच काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे म्हणजे जिल्ह्यातच एका विश्वस्ताच्या अट्टहासातून पादुका नेण्यात आल्या.
 
बातम्या आणखी आहेत...