आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opposition Only Cursing, CM Critise On Narendra Modi

विरोधकांना शिव्या देण्याचे काम, नरेंद्र मोदींवर साधला मुख्यमंत्र्यांनी निशाणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- निवडणुका जवळ आल्याने नवनवीन नेते पुढे येत आहेत. त्यामुळे सत्तेचे सर्वोच्च पद मिळवण्यासाठी त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे; परंतु त्यांना खालच्या पातळीवर जाऊन टीका करत शिव्या देण्यापेक्षा दुसरे काहीच येत नाही, अशी खरमरीत टीका राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता केली.
लातुरात आयोजित काँग्रेसच्या वचनपूर्ती जनजागरण यात्रेच्या शुभारंभप्रसंगी शनिवारी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे होते. चव्हाण म्हणाले, जनतेने भाजपला सत्तेची संधी देऊन पाहिली; परंतु त्यांचा कारभार पाहून 2004 मध्ये त्यांच्यावर जनतेनेच विश्वास ठेवला नाही. पर्यायाने त्यांना दिल्लीच्या सत्तेतून हद्दपारही व्हावे लागले. त्यानंतर सलग 10 वर्षांसाठी काँग्रेसला सत्ता मिळाली. काँगे्रसने सर्वच घटकांचा विकास साधण्याचा प्रयत्न केल्याने विरोधकांनी कितीही अपप्रचार केला, तरी 2014 मध्ये परिवर्तन न होता जनता पुन्हा यूपीए सरकारलाच सत्तेची संधी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.