आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूजच्या विवाहितेवर अंबडला अत्याचार; पाडळसिंगीच्या दोघा जणांवर गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- वाळूजच्या (औरंगाबाद) विवाहितेला उपचारकामी बीडला बोलावून परत सोडण्यासाठी नेताना अंबड तालुक्यात एकाने तिच्यावर  बलात्कार  केल्याची घटना शुक्रवारी  उघडकीस आली आहे. अत्याचारानंतर महिलेला रस्त्यातच  सोडून पसार होणाऱ्या गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथील  दोन आरोपींवर अंबड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक दाभाडे, प्रशांत बजगुडे (दोघे रा. पाडळसिंगी ता. गेवराई) अशी आरोपींची नावे  असून दोघेही फरार झाले आहेत.  
 
 वाळूज भागातील बकवालनगर येथील ३६ वर्षीय  विवाहिता औरंगाबादेतच एका हॉटेलात काम  करत होती. या हॉटेलमध्ये (अशोक दाभाडे रा.पाडळसिंगी ता.गेवराई ) हा जेवणासाठी येत असे  दोन वर्षांपूर्वी  त्यांची विवाहितेबरोबर  ओळख झाली. तेव्हा  घर खर्चासाठी तिने अशोक दाभाडेकडून २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. पंधरा दिवसांपूर्वी ते  पैसे सव्याज परतही केले. मंगळवार  १२ सप्टेंबर २०१७  रोजी अशोक दाभाडे  सदरील महिलेला  मोबाइलवरून संपर्क  केला. तेव्हा  विवाहितेने आजारी असल्याचे त्याला सांगितले.  अशोक याने तिला उपचारासाठी बीडला येण्यास सांगितले. त्यानुसार सदरील महिला बीडला आल्यानंतर दाभाडे याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्री आठ वाजता डॉक्टरांनी सुटी दिली. तुला जीपमधून औरंगाबादला सोडतो असे सांगून  अशोक याने  गावातील प्रशांत बजगुडेला बोलावून घेतले. जीप (क्र. एमएच २३ एएस- ९९०९) मधून हे तिघे औरंगाबादकडे निघाले. वाटेत अंबड हद्दीत  जीप थांबवून महिलेला   झाडीत नेऊन अत्याचार केला.  दाभाडे याने तिला मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या देत तिला तेथेच सोडून निघून गेले.  पीडित महिला मदतीसाठी फिरत होती. तेव्हा रोहिलागडहून आलेली जीप अडवून तिने जीपमधील रत्नाकर भीमराव चौरे, अंकुश रामभाऊ मंडलिक (रा.औरंगाबाद ) यांना महिलेने  बेतलेला प्रसंग सांगितला.  
 
तीन वर्षांपासून हॉटेलवर करते काम  
पीडित  महिला ही बकवालनगर येथे कुटुंबासह किरायाने राहत असून पंढरपूर येथील एका हाॅटेलमध्ये ३ वर्षांपासून स्वयंपाकाचे  काम करते.  हॉटेलवर स्वयंपाकाचे काम करत असतानाच तिची ओळख अशोक दाभाडे याच्याशी झाली होती.
बातम्या आणखी आहेत...