आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद - सलग दोन वर्षांच्या जैविक शेतीनंतर 88 टक्के शेतकर्यांनी रासायनिकऐवजी जैविक शेतीच फायद्याची असल्याचे मत नोंदवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राच्या विद्यार्थ्यांनी ‘आत्मा’च्या मदतीने उस्मानाबाद तालुक्यातील खानापूर, कौडगाव या दोन गावांमध्ये हे संशोधन केले.
अभिनेता आमिर खान याने ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमाच्या माध्यमातून जैविक शेतीकडे लक्ष वेधल्यानंतर शेतकर्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत खालावत असून, राज्यातील काही भागांत रासायनिक खताच्या अतिवापरामुळे हजारो एकर जमीन नापीक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जैविक शेतीचा पर्याय सुचवण्यात येत आहे. मात्र, जैविक शेतीमुळे उत्पन्नात घट होत असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या मानसिकतेतून रासायनिकचा वापर वाढत आहे. मात्र, जैविक शेतीच्या पद्धतीमुळे उत्पन्नामध्ये फारसा फरक पडत नाही, हे उस्मानाबाद तालुक्यातील कौडगाव, खानापूर येथील 88 टक्के शेतकर्यांनी दाखवून दिले. त्यांनी दोन वर्षे जैविक खते वापरून हा अनुभव घेतला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डी. आर. बनसोड यांनी विद्यापीठ उपकेंद्रातील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आणि ‘आत्मा’ यांच्या विद्यमाने जैविक खत वापराचे फायदे दाखवून देण्यासाठी 2008-09 मध्ये गावे दत्तक घेऊन हा उपक्रम राबवला. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या 30 विद्यार्थ्यांनी गावात जाऊन शेतकर्यांना मार्गदश्रन केले.
विभागप्रमुख प्रा. डॉ. ए. एम. देशमुख यांच्या मार्गदश्रनाखाली दोन्ही गावांतील शेतकर्यांनी जैविक पद्धतीने शेती केली. खरीप आणि रब्बी या पिकांसह फळबागांचेही जैविक पद्धतीने उत्पादन घेण्यात आले. दोन वर्षे सतत चाललेल्या प्रयोगानंतर जैविक पद्धतीची शेतीच फायदेशीर असल्याचे निष्कर्ष आले.
दोन्ही गावांतील 88 टक्के शेतकर्यांनी जैविक शेतीचे फायदे स्पष्ट केले, तर 12 टक्के शेतकर्यांनी जैविक शेतीबद्दल तक्रारी केल्या. त्यामुळे गावांतील बहुतांश शेतकर्यांनी कमी खर्चाच्या, आरोग्याला पूरक असलेल्या जैविक शेतीचीच वाट धरली आहे. यावर्षी हा उपक्रम तालुक्यातील उपळा (मा.), पळसप या गावांमध्ये राबवण्यात येत आहे.
घरोघरी जाऊन केला जैविक शेतीचा प्रसार
शेतीसह आरोग्यावर होणार्या दुष्परिणामांची माहिती असूनही कमी उत्पन्नामुळे शेतकर्यांचा रासायनिककडे ओढा आहे. त्यामुळे जैविक खत म्हणजे काय, रासायनिकचे दुष्परिणाम कोणते, याबाबतची माहिती देण्यासाठी विद्यार्थ्यांनी गावात फेरी काढली. भित्तिपत्रके, चित्रप्रदश्रन करून जैविक शेती कशी करायची याची माहिती दिली. जैविक पद्धतीने बियाणे प्रक्रिया पटवून दिली. त्यानंतर शेतकर्यांना आत्मा संस्थेच्या माध्यमातून जैविक खताचे मोफत वाटप करण्यात आले. बीज प्रक्रियेपासून खत वापरण्याच्या पद्धतीपर्यंतची माहिती घरोघरी जाऊन मोफत दिल्यामुळे शेतकर्यांची मानसिकता बदलण्यास मदत झाली.
रासायनिक शेतीचे धोके
पिकासाठी वापरण्यात येणारी बहुतांश रासायनिक खते परदेशातून आयात होतात. केंद्र शासनाने नियंत्रण उठवल्यामुळे दीड वर्षामध्ये खताच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. पिकाला 85 टक्के खताचा उपयोग होत नाही. या खताचा अंश पाण्यात मिसळतो. त्यामुळे पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढते. या पाण्यामुळे नायट्रोसो हिमोग्लोबिनीया हा रोग होतो. खारटपणा निर्माण होऊन जमीन नापीक होते. तसेच पर्यावरणाला धोका होतो.
असे काढले निष्कर्ष
कौडगाव येथील 58 टक्के शेतकर्यांनी रासायनिक खताचा, 30 टक्के शेतकर्यांनी जैविक खताचा आणि 12 टक्के शेतकर्यांनी दोन्ही खतांचा एकत्रित वापर केला. खानापूरच्या 17 टक्के शेतकर्यांनी रासायनिक, 39 टक्के जैविक आणि 44 टक्के शेतकर्यांनी दोन्ही खते एकत्रित वापरली. रासायनिक आणि जैविक खतांचा वापर करणार्या शेतकर्यांच्या उत्पन्नात जवळपास समानता आढळली. मात्र, जैविक पिकाला अधिक भाव मिळाला.
खर्चामध्ये बचत झाली
गावात दोन वर्षे जैविक शेतीचा उपक्रम राबवल्यानंतर त्याचा परिणाम शेतीच्या उत्पादन खर्चावर दिसून आला. जैविक पद्धतीमुळे शेतीची सुपीकता वाढली आहे. उत्पादनही समाधानकारक झाले. आता बहुतांश शेतकरी जैविक शेती करीत आहेत. माधुरी गरड, सरपंच, खानापूर.
मानसिकता बदलण्याची गरज
रासायनिक खताचे दुष्परिणाम लक्षात घेऊन शेतकर्यांनी मानसिकता बदलण्याची गरज आहे. आम्ही केलेल्या पाहणीतून जैविक शेतीमुळे उत्पन्नात घट होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. समजून घेऊन शेतकर्यांनी जैविक शेती करावी. प्रा. डॉ. ए. एम. देशमुख, विभागप्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, विद्यापीठ उपकेंद्र, उस्मानाबाद.
\'सत्यमेव जयेत\' : हवेत विष पसरत आहे ?
जैविक सौंदर्य प्रसाधनांकडे महिलांचा वाढता ओढा!
जैविक इंधनावर उडतील विमाने
बीडमध्ये जैविक खत कारखान्यावर छापा
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.