आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातुरात अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलनाचे आयोजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर : महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने लातूर येथे  २९ ते ३१ मेदरम्यान सहावे अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील यांनी दिली.  
 
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांची, तर स्वागताध्यक्षपदी लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची निवड करण्यात आली आहे.  संमेलनाचे  उद्घाटन राज्याचे वित्त व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार असून या वेळी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, खा. डॉ. सुनील गायकवाड, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, जि. प. अध्यक्ष मिलिंद लातुरे, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे  अध्यक्ष श्रीपती काकडे आदी उपस्थित राहणार आहेत.  
 
संतसाहित्याचा प्रचार व प्रसार  करण्याच्या उद्देशाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यापूर्वी नाशिक, नवी मुंबई, शेगाव, नांदेड व पुणे येथे ही संमेलने पार पडली आहेत. येथील संमेलनाचा प्रारंभ दिंडी सोहळ्याने होणार आहे. या वेळी आमदार दिलीपराव देशमुख, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणारे आहे. एकूण सात सत्रांत पार पडणाऱ्या या संमेलनात शेतकरी आत्महत्या रोखणे, स्त्री भ्रूणहत्या रोखाने,  पाणी नियोजन, वृक्षारोपण, हुंडामुक्त विवाह, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती आदी विषयांवर परिसंवाद होणार आहेत.  संमेलनाच्या सांगता समारोहास केंद्रीय सामाजिक  न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे मुख्य सचिव सुमीत मलिक, आमदार अमित देशमुख, पुण्याचे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत दळवी, औरंगाबादचे महसूल आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संमेलनास राज्यातून फडकरी, दिंडीकरी, प्रवचनकार, कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत.  या वेळी वारकरी संप्रदायासाठी अमूल्य कार्य केलेल्या श्रीगुरू भगवान महाराज शिवणीकर  यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान केला जाणार असून या पुरस्काराचा स्वीकार ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर  हे करतील. वारकरी संप्रदायाच्या विशेष सेवेसाठीचा जीवनगौरव पुरस्कार नामदेव महाराज शास्त्री व चकोर महाराज बावीस्कर  यांना प्रदान केला जाणार आहे. अमृत जोशी महाराज यांना  महाराष्ट्र राज्याबाहेर वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसाराचे विशेष कार्य  केल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, तर वारकरी संप्रदायाची विशेष सेवा केल्याबद्दल  ज्ञानेश्वर महाराज जळगावकर  यांना गाडी प्रदान करून गौरवण्यात येणार आहे.
 
बातम्या आणखी आहेत...