आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत अनाथ अल्पवयीन मुलीवर युवकाचा बलात्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- पार्वतीनगरातील बालगृहातील अनाथ अल्पवयीन मुलीवर महिनाभर बालगृह अधीक्षिकेच्याच मुलाने अत्याचार केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अधीक्षिकेसह तिच्या मुलास अटक केली आहे.

शहरातील पार्वतीनगर भागात तुराबत बालगृह असून येथे एक अल्पवयीन मुलगी (१३) अन्य मुलींसह वास्तव्यास होती. या वसतिगृहाच्या अधीक्षक म्हणून शेख शाहीन ही महिला काम पाहत होती. तिच्यासह तिचा मुलगा शेख तौसिफ अहेमद हाही होता. २४ जून ते २९ जुलै २०१६ या कालावधीत मुलगा तौसिफ याने त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणाची माहिती त्या मुलीने वेळोवेळी अधीक्षिका शेख शाहीन यांना दिल्यानंतरही त्यांनी आपल्या मुलाला पाठीशी घालण्याचेच काम केले. तिच्या तक्रारीची दखलच अधीक्षिकेने घेतली नाही. उलट, मुलालाच पाठीशी घातल्याने महिनाभरापेक्षाही जास्त कालावधीत तौसिफने पीडित मुलीशी सलगी करीत वेळोवेळी जबरी संभोग केला असल्याचे पीडित मुलीने फिर्यादीत म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...