आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Osamanabad News In Marathi, Nationalist Congress Party, Shiv Sena

उस्मानाबादेत राष्‍ट्रवादी-शिवसेना आमदारांत जुंपली, लाइव्ह कार्यक्रम रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात गुरुवारी सायंकाळी राष्‍ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील व शिवसेना आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले. त्यामुळे लाइव्ह कार्यक्रम रद्द करण्यात आला.


वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सर्वपक्षीय उमेदवार, आमदार, विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. तेरणा साखर कारखान्याविषयी चर्चा सुरू झाल्यानंतर जगजितसिंह आणि ओमराजे यांच्यात बाचाबाची झाली. या वेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. त्यामुळे हाणामारी सुरू झाली. परिणामी वृत्तवाहिनीला कार्यक्रम थांबवावा लागला.