आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुरडीचा होरपळून मृत्यू; तीन जण भाजले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - कुडाच्या घराला लागलेल्या आगीत होरपळून आठवर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. अन्य तीन लहान मुले गंभीर भाजली असून त्यांच्यावर उमरगा, सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उमरगा तालुक्यातील बेरडवाडी येथे मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
बेरडवाडी येथे वस्तीवर राहणाºया अमृत मकण्णा मंडले यांच्या कुडाच्या घराला चुलीतील विस्तवामुळे मंगळवारी रात्री आग लागली. बचावासाठी त्यांनी लहान मुलांना घेऊन कुडाच्या मागच्या दाराने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्यांची मुले पूजा (८), मुलगा बसण्णा, विक्रम (९), विद्या (4), अंजली आगीत होरपळले. त्यांना मुरूम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना सोलापूरला हलवण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, सोलापूरला नेताना पूजाचा वाटेतच मृत्यू झाला.