आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उस्मानाबाद जिल्ह्यातील शहरी मतदारांनी भाजप-सेनेला नाकारले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठपैकी पाच पालिका ताब्यात घेत राष्ट्रवादीने क्रमांक एकचे यश मिळवले, तर काँग्रेसने दोन पालिका स्वत:कडे घेतल्या. शिवसेनेला पूर्वीच्या दोन्ही जागा सोडाव्या लागल्या. मात्र, उस्मानाबादची पालिका साडेनऊशे मतांनी ताब्यात घेतली.
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक विधानसभेचे आमदार आहेत. जिल्ह्यात पक्षाला वाव मिळावा, यासाठी भारतीय जनता पक्षाने तसेच शिवसेनेने विधान परिषदेच्या माध्यमातून सुजितसिंह ठाकूर आणि प्रा. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून जिल्ह्यात दोन आमदार दिले. विशेष म्हणजे दोन्ही आमदारांची कर्मभूमी परंडा आहे. भूम-परंडा-वाशी हा विधानसभेचा मतदारसंघ मात्र राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे साहजिकच या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपचे अस्तित्व निर्माण होईल, अशी अपेक्षा होती. याउलट घडले आणि परंडा पालिका शिवसेनेच्या ताब्यातून राष्ट्रवादीकडे आली. भूम पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता होती. सदस्यसंख्येत वाढ होऊन ही पालिका पुन्हा राष्ट्रवादीनेच पटकावली.
राणा पाटलांचे वर्चस्व
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील सक्रिय राजकारणातून काहीसे बाजूला सरकल्यानंतर पक्षाची धुरा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर आली आहे. त्यांनी पाच वर्षांत जिल्ह्यात पक्षाची अचूक बांधणी केली असून त्यामुळेच राज्य किंवा केंद्र सरकारचा प्रभाव असतानाही राष्ट्रवादीला यश मिळत आहे. आठपैकी पाच पालिका ताब्यात घेऊन त्यांनी पुन्हा एकदा डॉ. पद्मसिंहांची परंपरा राखल्याचे बोलले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...