आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टवाळखोरीमुळे उस्मानाबादेतील मुली असुरक्षित.!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्ह्यात मुली-महिला अबला ठरत आहेत. कधी अनैतिक शारीरिक संबंधासाठी, कधी एकतर्फी प्रेमातून मुलींवर अत्याचार सुरू आहेत. छेडछेडीच्या प्रकरणांमुळे मुलींना शिक्षणावर पाणी सोडावे लागत आहे. क ायदा होऊनही विवाहितांना हुंड्याच्या पैशासाठी भरदिवसा जाळण्याच्या भयकारी घटना घडत आहेत. हे प्रमाण वर्षागणिक वाढत आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील गडदेवधरी गावात मुलाने छेड क ाढल्यामुळे गुरुवारी सायंकाळी 14 वर्षांच्या मुलीने पेटवून घेतले. उपचारादरम्यान, शनिवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. गावातल्या मुलाने तिला चिठ्ठी दिली होती, त्यातून हा प्रकार घडला. या घटनेने जिल्ह्यातील मुलींच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. शहरी भागात शिक्षणाच्या सुविधा विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे खेड्यातील मुलींचा शहराकडे ओढा आहे. उस्मानाबाद शिक्षणासाठी सोयीस्कर झाले आहे. त्यामुळे खेड्यातील मुली शाळा-महाविद्यालयीन शिक्षणासाठी किरायाने खोल्या घेऊन शहरात वास्तव्य करतात. आई-वडिलांशिवाय राहणार्‍या अशा मुलीं टवाळखोरांकडून टार्गेट केल्या जातात. रस्त्यावरून जाताना स्टायलिश लूकच्या मोटारसायकलीवरून मुलींना चिठ्ठी देण्याचे, बोलण्याचे, छेड काढण्याचे प्रकार घडतात. प्रतिकार करणार्‍या मुलींवर दबाव आणला जातो. शाळा-महाविद्यालयाच्या आवारातही अशा घटना घडतात. बसमधून शहरात शाळा-महाविद्यालयासाठी येणार्‍या मुलीही टवाळखोरांच्या बळी ठरत आहेत. शिक्षण बंद होण्याच्या भीतीने या मुली नातेवाइकांकडे किंवा पोलिसात तक्रार करीत नाहीत.
पाच वर्षांत अडीच हजार तक्रारी- उस्मानाबाद महिला सुरक्षा विशेष कक्षात सन 2007 पासून जून 2012 अखेर सुमारे 2301 तक्रारी दाखल झाल्या आहेत. टवाळखोर मुलांविरुद्ध 68 तक्रारी दाखल झाल्या आहेत. या विभागाकडून दुभंगलेली मने जुळवण्याचे काम सुरू आहे. कर्नाटक राज्याच्या सीमेवरील उमरगा तालुक्यासाठी पोलिस विभागाने तेथे स्वतंत्र महिला सुरक्षा विशेष कक्ष सुरू केला आहे. या केंद्रात तीन वर्षात सुमारे 303 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये बहुतांश तक्रारी हुंड्यासाठी होणार्‍या छळाच्या आहेत. 2009 मध्ये 98, 2010 मध्ये 73, 2011 मध्ये 82 आणि चालू वर्षातील तीन महिन्यात 50 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
छेडछाड पथकाची धास्ती- छेड काढून मुलींना सतावणार्‍या टवाळखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी महिला पोलिस तक्रार निवारण केंद्राअंतर्गत छेडछाड विरोधी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाने पाच वर्षात शेकडो टवाळखोरांचा बंदोबस्त केला आहे. चार वर्षात पथकाकडे सुमारे 68 मुलींनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, टवाळखोरीचे लोण आता ग्रामीण भागातही पोहोचल्याने तेथील मुली टार्गेट होत आहेत. त्यामुळे प्रत्येक पोलिस ठाण्यात अशा पथकाची नेमणूक करण्याची गरज आहे.