आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गडकरी पुतळ्याचा विषय नाट्य संमेलनात कशाला?\' उस्मानाबादच्या संमेलनात निषेधाचा ठरावही नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
सुलभा देशपांडे नाट्यनगरी (उस्मानाबाद) - पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवल्याच्या प्रकाराचा निषेध नाट्य संमेलनात कशाला, अशी भूमिका नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात याबाबतीत निषेधाचा ठराव मांडण्यात आला नाही. हा ठराव ज्यांनी मांडायला हवा त्या पुण्यातील नाट्य परिषदेच्या दोन्ही शाखांचा एकही पदाधिकारी परिषदेच्या रविवारी झालेल्या बैठकीला फिरकला नाही.  
 
गडकरी यांचा पुतळा हटविल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद साहित्य, नाट्य क्षेत्रात उमटले होते. पुतळा पुन्हा बसवावा, अशी जोरकस मागणी कोथरूड शाखेने लावून धरली आहे.   काही कलावंतांनी हा रेटा पुढे नेल्याने त्याचे प्रतिसाद नाट्य संमेलनात उमटतील अशी अपेक्षा गडकरी प्रेमी व्यक्त करत होते, पण पुण्याच्या दोन शाखांच्या पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती आणि हा विषय इथे कशाला, अशी नाट्य परिषदेच्या अध्यक्षांची भूमिका यामुळे गडकरी यांच्या पुतळ्याचा विषय ‘संन्यासा’तच राहिला आहे.    नाट्य परिषदेची विषय नियामक मंडळ सभा रविवारी येथे झाली. मात्र, पुणे व कोथरूड शाखेचा एकही पदाधिकारी किंवा प्रतिनिधी उपस्थित नव्हता. पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख व प्रमुख कार्यवाह दीपक रेगे संमेलनाच्या उद‌्घाटन सोहळ्याला उपस्थित होते, पण बैठकीला ते उपस्थित नव्हते. तसेच इतर पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती नव्हती. नवीन सुरू झालेल्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी पुतळ्याचा विषय लावून धरला आहे, मात्र कौटुंबिक अडचणींमुळे ते नाट्य संमेलनाला उपस्थित नव्हते. त्यांच्या ऐवजी या शाखेचा एकही पदाधिकारी बैठकीला हजर नव्हता. 
 
पुण्यातील पदाधिकारी बैठकीलाच गैरहजर
संमेलनाध्यक्षांचेही माैन  
नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांनीही गडकरी पुतळ्याबाबत जाहीर वाच्यता टाळली. सावरकर यांनी सुरुवातीपासून या प्रकारावर कडाडून हल्ला चढवला होता. त्यामुळे ते तरी काही भूमिका घेतील अशी अपेक्षा होती, परंतु संमेलनात गोंधळ नको म्हणून त्यांनीही शांततेचेच धोरण स्वीकारल्याचे पत्रकारांशी झालेल्या संवादात जाणवले. गडकरी यांच्या नाटकात काम केलेला मी एकमेव हयात कलावंत आहे, असे सावरकर सांगत असतात हे विशेष.   
 
उग्र रूप द्यायचे नाही  
-गडकरींच्या पुतळ्याबाबत आम्ही जिथे निषेध नोंदवायचा व दबाव गट निर्माण करायचा तिथे तो केला आहे. इथे हा विषय कशाला? या विषयाला उग्र रूप द्यायचे नाही. याबाबतीत महापौरांशी बोलणी झाली आहे.  - मोहन जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद 
बातम्या आणखी आहेत...