उस्मानाबाद – जिल्ह्यातील तामलवाडी (तुळजापूर) शेतशिवारात एका 25 ते 30 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून करण्याचा प्रकार 23 जुलैला उडकीस आला होता. महिलेच्या मृतदेहाजवळ तिची दीड वर्षांची चिमुकली रात्रभर एकटीच टाओ फोडत होती. तिची ओळख पटली असून, पोलिसांनी काल (शुक्रवार) रात्री मारेक-यालाही अटक केली आहे. मृत महिनेचे चार विवाह झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. सपंत्तीत वाटा मागत असल्याने तिच्या खून केल्याची कबुली पहिल्या पतीचा पुतण्या गेल्या तीन दिवसांपासून एका निरागस कोवळ्या मुलीचा सोशल मीडियावरून व्हायरल झालेला फोटो पाहून अनेकांचे हृदय पिळवटून जात होते. कारण चिमुरडीच्या आईचा निर्जनस्थळी खून करून टाकण्यात आला होता. ती रात्रभर एकटीच तिथे टाओ फोडत होती. आता पोलिसांनी तिच्या आईच्या मारेकऱ्यांना शोधून काढले असून, या प्रकरणाचा छडा लागल्याने चिमुरडीला तिचे वडील मिळणार आहेत. दरम्यान, मृत महिला ही टीव्ही कलाकार असून, कलावती महंतू (35) असे तिचे नाव तिचे दोन लग्न झालेले आहेत, हीही माहिती समोर आली आहे. तिच्या चिमुकलीचे नाव पूजा आहे. पहिल्या नव-याच्या पुतण्या असलेल्या सिद्धाराम राजकुमार खांडेकर (२५, रा. हालचिंचोली, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) याने उसण्या पैसाच्या देवाण घेवाणीतून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले.सिद्धू ऊर्फ सिद्धाराम खांडेकर (वळसंग, ता. अक्कलकोट) याने दिली आहे. मृत महिला ही मुंबईतील जोगेश्वरी येथील रहिवाशी असून, कलावती शंकरकुमार मेहता असे ती नाव आहे तर पूजा हे चिमुकलीचे नाव आहे.