आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघ्यांच्या अतिउत्साहामुळे बघ्यांच्या अतिउत्साहामुळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - हिमायतनगर येथील फुलेनगरात मंगळवारी सकाळी सातच्या सुमाराला नाल्याच्या काठावर राहणा-या नागरिकांच्या अंगावर चित्तथरारक दृश्याने काटा उभा राहिला, परंतु या बघ्यांच्या अतिउत्साहामुळे एका नागाला प्राण गमवावे लागले.

सकाळी नाल्याच्या काठ्यावर कोब्रा जातीचे दोन नाग समोरासमोर झुंजले. नागाचे फुत्कार ऐकून आजूबाजूला राहणा-या 20-25 बघ्यांची गर्दी त्या ठिकाणी जमली. नागाच्या या लढाईत एका नागाने दुस-या नागाला अर्धवट गिळले. गिळलेल्या नागाचे प्राण वाचविण्याच्या उद्देशाने बघ्यांच्या गर्दीतील काही उत्साही तरुणांनी गिळणा-या नागाला बांबूने टोचण्या मारल्या. या टोचण्यामुळे त्या नागालाही जखमा झाल्या. एक नाग गिळल्याने
मरण पावला, तर दुसरा बघ्यांच्या अतिउत्साहामुळे मरण पावला.

सापांचा मेटिंग सीझन
सर्पतज्ज्ञ डॉ.दिलीप पुंडे यांना यासंदर्भात सांगितले, सध्या सापांचा मेटिंग सीझन आहे. हे दोन्ही साप कोब्रा जातीचे आहेत. परंतु सापाच्या बाह्यांगावरून तो नर अथवा मादी हे ओळखता येत नाही. केवळ किंग
कोब्रा व मण्यार जातीचे सापच दुस-या सापाला खातात. या दोन्ही जाती आपल्या भागात नाहीत.