आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅक्टर ट्रॉली उलटून दोन ठार, एक गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित फाेटो - Divya Marathi
संग्रहित फाेटो
बदनापूर - सिमेंट खांब नेणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटून दोघे ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. जालना-औरंगाबाद मार्गावरील संत सेवानगर तांड्याजवळ रविवारी दुपारी हा अपघात झाला. तिघेही गोकुळवाडीचे आहेत. वरुडी येथे रोहित्र बसविण्यासाठी गोकुळवाडी येथून ट्रॅक्टरने सहा खांब नेले जात होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॉली दुभाजकावर धडकली. या अपघातात कैलास राघूजी लोखंडे (३२), विक्रम सांडू भडांगे (२३) हे दोघे ठार, तर नानासाहेब रावसाहेब लोखंडे (३२) हे गंभीर जखमी झाले.
बातम्या आणखी आहेत...