आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणमध्ये चार कोटींचा अवैध वाळूसाठा जप्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - वाळू तस्करांनी गोदावरी नदीच्या पात्रातून बेसुमार वाळू उपसा करून हजारो ब्रास वाळूचे साठे करून ठेवले होते. या वाळू साठ्यांवर रविवारी पहाटे पोलिस अधीक्षक इशू संधू यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत वाळूसाठा जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. या वाळूची किंमत चार कोटी रुपये इतकी आहे.
पाटेगाव पैठण या संयुक्त वाळूपट्ट्यात जमीन गट नं. 196मध्ये 01 क्षेत्रात वाळूसाठा करण्याची परवानगी देण्यात आली होती. जेवढ्या वाळूसाठ्याचा परवाना गायत्री एंटरप्रायजेस यांना दिला होता त्यापेक्षा अधिक वाळूसाठा करून कायद्याचा भंग केल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला होता. मात्र, तरीही परवानाधारक आशिष शर्मा यांनी वाळू पट्ट्यातून उपसा करून मोठ्या प्रमाणात वाळूसाठा केला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी अडकुणे व पोलिस अधीक्षक इशू संधू यांच्या पथकाने रविवारी पहाटे या 6 एकर 32 गुंठे मधील प्रचंड वाळू ज्याचे मोजमाप केले असता तब्बल 30444 ब्रास अनधिकृत वाळूसाठा , तीन वाहने, सहा पोकलँड मशीनसह 22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याची एकूण किमत 3 कोटी 94 लाख 42 हजार एवढी आहे.