आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणा अंतर्गत दशक्रिया विधी घाटाचे काम अंतिम टप्प्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - दक्षिण काशी अशी ओळख लाभलेल्या पैठण येथे प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या दशक्रियाविधी घाटाचे काम अंतिम टप्प्यात आहे. १२ कोटी २० लाखांच्या निधीतून मराठवाड्यातील सर्वात मोठा घाट आणि तोही नाथ मंदिरामागे झाल्यामुळे गोदावरीचे प्रदूषण थांबणार आहे. या नव्या घाटामुळे दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या भाविकांच्या अडचणीही दूर होणार आहेत.
पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ६८ मीटर रुंद, १९२ मीटर लांब आणि दशक्रियांसाठी १० हॉल असणाऱ्या या घाटाचे काम वर्षभरापासून सुरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे. मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांतून अनेक भाविक दशक्रियाविधीसाठी पैठणमध्ये येतात. विधी पूर्ण झाल्यानंतर भाविक सर्व साहित्य गोदावरीच्या पात्रात टाकत असल्यामुळे प्रदूषणात भर पडत होती. मात्र, आता ही भाविकांची अडचण दूर होणार आहे.
अडचणी होतील दूर
विविध धार्मिक विधींसाठी येणाऱ्या भाविकांना जागेअभावी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. मात्र, ६८ मीटर रुंद व १९२ मीटर लांबीच्या नव्या दशक्रियाविधी घाटावर १० हॉल बांधल्यामुळे या अडचणी दूर होणार आहेत.

भाविकांची होईल सुविधा
यापूर्वी अस्थी विसर्जनासाठी खोल गोदापात्रात जावे लागत होते. मात्र, यापुढे थेट घाटांवरून अस्थींचे विसर्जन करता येईल. शिवाय घाटाची लांबी जास्त असल्यामुळे एकाच वेळी गर्दी झाली तरी भाविकांना अडचणी येणार नाहीत.