आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणमध्ये अर्थसंकल्पीय सभेत नगरसेवकांना साेन्याच्या अंगठ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - एकीकडे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या अात्महत्या वाढत असतानाच दुसरीकडे पैठणच्या नगरपालिकेत नगरसेवकांवर चक्क ५ ग्रॅम साेन्याच्या अंगठ्यांची उधळण केली जात असल्याचे उघड झाले अाहे. मंगळवार, २८ फेब्रुवारी  राेजी पैठण नगरपालिकेत अर्थसंकल्प सादर करण्यात अाला. यानंतर सभेस उपस्थित प्रत्येक नगरसेवकाला बंद पाकिटात चक्क पाच ग्रॅम साेन्याची अंगठी देण्यात अाली. 
 
शिवसेनेच्या सात नगरसेवकांनी यावर अक्षेप घेत अंगठ्या नाकारल्या.  पालिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर या वृत्ताला दुजाेरा दिला अाहे. मात्र, नगराध्यक्षांनी असा काेणताही प्रकार झाला नसल्याचे म्हटले अाहे.   
 
मंगळवारी दरवर्षीप्रमाणे २०१७-१८ चा ५१ काेटी ३७ लाख सात हजार रुपये खर्चाच्या तसेच १० लाख २९ हजार दाेनशे रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्प विशेष सभेचे नगराध्यक्ष सूरज लाेळगे यांच्या अध्यक्षतेखाली अायाेजन करण्यात अाले हाेते. मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी यांच्यासह नगरपालिकेतील नगरसेवक, नगरसेविका या विशेष सभेत उपस्थित होते.
 
अर्थसंकल्पाचे वाचन झाल्यानंतर सर्व नगरसेवकांच्या पुढ्यात बंद पाकीट ठेवण्यात अाले. या बंद पाकिटात नेमके काय या उत्सुकतेपाेटी सर्व नगरसेवकांनी पाकीट उघडले असता त्यात प्रत्येकी पाच ग्रॅम साेन्याची अंगठी असल्याचे स्पष्ट झाले. यावर शिवसेनेच्या नगरसेवकांनी अाक्षेप घेत अंगठ्या स्वीकारण्यास नकार दिला. नेमक्या काेणत्या कारणांसाठी व  कुणी या अंगठ्यांचे वाटप केले हे मात्र गुलदस्त्यातच अाहे. 

पाच वर्षांपूर्वी बंद झाली हाेती प्रथा   
पाच वर्षांपूर्वीपर्यंत अर्थसंकल्पादरम्यान साेन्याच्या अंगठ्या देण्याची प्रथा हाेती, मात्र शिवसेनेने ही प्रथा बंद पाडली. अाता पुन्हा प्रथा सुरू करणे घातक अाहे. शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी अंगठ्या घेण्यास नकार देत अादर्श निर्माण केला - दत्ता गाेर्डे, माजी नगराध्यक्ष, न.प. पैठण. 

असे आहेत सोन्याचे दर
{ सध्या साेन्याचे प्रति पाच ग्रॅम दर- १५ हजार रुपये.    
{ १६ नगरसेवकांच्या अंगठ्यांचा खर्च- २.४० लाख रुपये.

अंगठ्यांचे वाटप नाही   
सभेदरम्यान अंगठ्यांचे वाटप केलेले नाही. असा  प्रकार झालेला नाही. - सूरज लाेळगे, नगराध्यक्ष. 
 
बातम्या आणखी आहेत...