आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणला जुगार अड्ड्यावर छापा, २२ जण ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - औरंगाबाद-पैठण रस्त्यावरील ढोरकीननजीक असलेल्या हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून २२ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून ८१ हजारांची रोकड जप्त केली. तसेच २० मोबाइल, दुचाकी तसेच चारचाकी असा सुमारे दहा लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतला.

पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी दुपारी ढोरकीन येथील महाराणा हॉटेलवर छापा मारला. हॉटेलच्या छतावर २२ जण झन्ना-मन्ना जुगार खेळत होते. या वेळी पोलिसांनी जुगार चालक शेख रफिक शेख लतीफ याला पकडून त्यांच्याकडील ८१ हजार ३९० रुपये, २० मोबाइलसह दुचाकी चारचाकी वाहने जप्त केली. जुगार खेळणाऱ्यांमध्ये काही स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचा समावेश आहे.

अज्ञात व्यक्तीच्या मेसेजमुळे केली कारवाई
एका अज्ञात व्यक्तीने प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना एसएमएस करून ढोरकीन येथे जुगार अड्डा सुरू असल्याचा मेसेज पाठवला. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, या िठकाणी अनेक िदवसांपासून जुगार अड्डा सुरू होता; परंतु पोलिस कारवाई करत नव्हते. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश िदल्याने पोलिसांना कारवाई करावी लागली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.