आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व कैद्यांचे दाणापाणी बंद होण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - पैठण येथील खुल्या कारागृहातील ३६६ कैद्यांच्या उपोषणामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील एकाही कारागृहाला अन्नधान्याचा पुरवठा झाला नसल्यामुळे त्या कैद्यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.

पैठणच्या खुल्या कारागृहात ४१५ कैदी असून ते कारागृहाच्या ४५० एकर शेतीत विविध उत्पादने घेतात. येथूनच मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अमरावती, पुणे आदी कारागृहांना भाजीपाला, ज्वारी, बाजरी, गहू, मुगासह धान्याचा पुरवठा होतो. जायकवाडी धरणाच्या बाजूलाच खुले कारागृह असून तेथेच कारागृहाच्या मालकीची ४५० एकर शेती आहे.

या परिसरात दरवर्षी लाखो रुपयांच्या भाजीपाल्याचे उत्पादन हाेते. ऊस, बाजरी, मूग, ज्वारी, गहू आदी पिकेही घेतली जातात. हे धान्य राज्यभरातील कारागृहांना पुरवले जाते. अन्नधान्य पिकवणे, पॅकिंग करून ट्रकमध्ये भरण्यापर्यंतची सर्व कामे कैदीच करतात. मात्र, जन्मठेपेच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होऊनही सुटका न झाल्यामुळे ३६६ कैद्यांनी जेवण घेण्यास नकार देत आंदोलन सुरू केल्याने खुल्या कारागृहातील सर्व कामे ठप्प पडली आहेत.

पुरवठाही अशक्य
कैद्यांच्या आंदोलनाचा परिणाम शेतीकामांवर झाला आहे. इतर कारागृहांना भाजीपाला, धान्य पुरवठा करणेही अशक्य झाले आहे. - राजकुमार साळी, कारागृह अधीक्षक, पैठण