आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हारताळ; मुदत उलटूनही अहवाल प्रलंबित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- जायकवाडी प्रकल्पात गोदावरीतून येणार्‍या पाण्यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समान पाणी वाटप करण्यासाठी एकात्मिक नियम बी परिचल हा सर्व धरणासंदर्भातील आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्यापही आराखडा तयार झाला नसल्याने यंदा तरी जायकवाडीला समान पाणी वाटपातून पाणी मिळण्याची आशा धूसर झाल्याची दिसते.

मराठवाड्याची तहान भागवणारा जायकवाडी प्रकल्प यंदा प्रथमच 36 वर्षांत मृत जलसाठ्यावर आला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराला तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागली. त्यातच मुख्यमंत्री चव्हाण यांच्या आदेशाने जायकवाडीत वरील धरणातून पाणी सोडण्यात आले. मात्र, तेही पाणी पुरेसे मिळाले नसल्याने पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे मुख्यमंत्री चव्हाण यांनी गोदावरीचे पाणी हे समान वाटप करायचे जाहीर केले होते. यासंदर्भात आराखडा तयार करण्यासाठी एकात्मिक नियम बी परिचल हा सर्व धरणासंदर्भातील आराखडा तयार करण्यासाठी वाल्मीचे महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यासाठी 31 मेपर्यंत अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या समितीने अद्यापही जायकवाडी संदर्भातील नियोजन केलेले नाही.

एकात्मिक नियम बी परिचल अंतर्गत अहवाल तयार करण्यासाठी नाशिक, पुणे येथील पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ 22 अभियंत्यासह औरंगाबाद विभागाचा 1 अभियंता, गोदावरी विकास खोरे महामंडळातील सदस्य, पाटबंधारे विभाग (कडा) कार्यालयाने जायकवाडी प्रकल्पाच्या नियोजन संदर्भात समितीला सादर करायच्या होता. मात्र, तो सादर झाला नाही.

संबंधित समितीला जो अहवाल शासनाला सादर करायचा आहे. त्याची माहिती देण्याचे काम आम्ही करत आहोत. यासाठी काही दिवस लागतील.
- जी. एन. हिरे, शाखा अभियंता,