आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपिटीच्या संकटातून उभे राहण्याची शक्ती दे !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - यंदाची नाथषष्ठीची काल्याची दहीहंडी कोण फोडणार, याची चर्चा सुरू असताना कोणताही वंशवाद न घालता रावसाहेब महाराज गोसावी यांचे पुत्र पुष्कर महाराज गोसावी यांनी काल्याची दहीहंडी फोडली. वंशवाद बाजूला ठेवून दहीहंडी फोडल्याने वारकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, फेब्रुवारी अखेर व मार्चच्या सुरुवातीला झालेल्या गारपिटीच्या संकटातून सावरण्याची शक्ती दे, असे साकडे नाथांना घालून वारकरी मार्गस्थ झाले.

गेल्यावर्षीच्या वादामुळे यंदाची दहीहंडी कोण फोडणार, याची सर्वांना उत्सुकता लागली होती. परंतु रविवारी संध्याकाळी नाथवंशज रावसाहेब महाराजांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांचे पुत्र पुष्कर महाराज गोसावी यांनी दहीहंडी फोडली.

रघुनाथबुवा पालखीवाले यांची दिंडी प्रथम मंदिरात दत्तकपुत्र रघुनाथबुवा पालखीवाले यांनी आपली मानाची दिंडी सव्वासहा वाजता आणली. रघुनाथबुवा मंदिरात अगोदर आल्याने नाथवंशज आता दहीहंडी फोडण्यासाठी येणार काय, असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. मात्र, साडेसहा वाजता नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी यांचे पुत्र पुष्कर महाराज गोसावी हे आपल्या दिंडीसह मंदिरात आले. या वेळी खा, दानवे, खरै व विलास औताडे उपस्थित होते.