आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panchayat Raj News In Marthi, Jalna, Congress, Divya Marathi

जालन्यात युती, लातुरात काँग्रेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - जिल्ह्यातील जालना पंचायत समितीत सत्तांतर झाले आहे. काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही पंचायत समिती शिवसेना-भाजप युतीने ताब्यात घेतली. मनसेच्या एका सदस्याने शिवसेनेत प्रवेश केल्याने हा बदल झाला. येथे सेनेच्या ध्रुपदाबाई थेटे सभापती तर भाजपचे गणेश नरवडे उपसभापती झाले. भोकरदनला भाजपच्या संगीता लोखंडे यांची सभापतिपदी तर शिवसेनेच्या नवनाथ दौड यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली.

मंठा येथे शिवसेना-भाजप युतीने काँग्रेसची मदत घेतली. येथे शिवसेनेच्या ऊर्मिला सरोदे सभापती तर काँग्रेसचे संतोष पवार उपसभापती झाले. बदनापूर पंचायत समिती पुन्हा आपल्याकडे राखण्यात आघाडीला यश आले. येथे राष्ट्रवादीचे अदनान सौदागर सभापती तर काँग्रेसचे संजय जगदाळे उपसभापती झाले. जाफराबाद ला भाजपच्या रमाबाई चौथमल यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. उसभापतिपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली. अंबड पंचायत समितीत राष्ट्रवादीच्या ज्योती गावडे सभापती तर मदन जायभाये यांची
उपसभापतिपदी निवड झाली.

घनसावंगी पंचायत समितीत शिवसेनेचे प्रेमसिंग राठोड सभापती तर डॉ. राजेश राऊत यांची उपसभापतिपदी निवड झाली. परतूर पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या छाया माने यांची पुन्हा निवड झाली, तर उपसभापतिपदी तुकाराम बोनगे यांची निवड झाली. आठपैकी सहा पंचायत समित्यांवर शिवसेना-भाजप युतीने वर्चस्व राखल्याने युतीच्या समर्थकांनी फटाके
फोडून जल्लोष केला.

बीड | राष्ट्रवादीने सहा तर भाजपने पाच पंचायत समित्यांवर वर्चस्व िमळविले आहे. पाटोदा पंचायत समितीच्या सभापतिपदी धस गटाचे अिनल जायभाये सभापती झाले तर आष्टीमध्ये अनुसूिचत जातीसाठी राखीव असलेल्या जागी भाजपचे भीमराव धोंडे गटाच्या प्रियंका सावंत एकमेव पात्र असल्याने सभापतिपदी त्यांची वर्णी लागली. िकल्लेधारूरमध्ये रमेश आडसकर यांच्यामुळे सत्तांतर होऊन पंचायत समिती राष्ट्रवादीकडून भाजपकडे आली. केजमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपकडे समान सात सात सदस्य असल्याने टॉस झाला. यात भाजपच्या अनिता मोराळे यांना सभापती होण्याचा मान िमळाला. वडवणीत देखील राष्ट्रवादी आणि भाजपकडे प्रत्येक दोन सदस्य आहेत. त्यामुळे तेथेही िचठ्ठया टाकून सभापती िनवडावा लागला. यात राष्ट्रवादीच्या मीरा ढोले यांची सभापतिपदी िनवड झाली. बीडमध्ये राष्ट्रवादीचे काकासाहेब जोगदंड सभापती झाले तर परळीत भाजपकडे पूर्ण बहुमत असल्याने िवद्यावती गडदे यांची िनवड झाली. माजलगाव पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने तेथे अनिता थावरे उपसभापतिपदावरून सभापतिपदी बिनविरोध िनवडल्या गेल्या. शिरूर कासार येथे भाजपच्या माजी सभापती मंडाबाई केदार यांची बिनविरोध िनवड झाली. गेवराईत आमदार अमरसिंह गटाच्या आशाबाई गव्हाणे यांची बिनविरोध िनवड झाली.

लातूर | जिल्ह्यात काँग्रेसचे सहा तर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे प्रत्येकी दोन ठिकाणी सभापती निवडले गेले. लातुरात सभापतिपदी काँग्रेसचे रावसाहेब भालेराव यांची तर उपसभापतिपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उदगीरमध्ये काँग्रेसच्या सुनीता हाळे या सभापती तर उपसभापती म्हणून ज्ञानोबा गोडभरले यांची बिनविरोध निवड झाली. अहमदपूरमध्येही काँग्रेसनेच बाजी मारली. आर. डी. शेळके सभापती तर लक्ष्मण पाटील यांना बिनविरोध उपसभापतीची संधी मिळाली. िनलंग्यात काँग्रेसच्या चमनबाई हुलसुरे यांची सभापतिपदी तर उपसभापतिपदी राजकुमार चिंचनसुरे यांची निवड झाली. रेणापूरमध्ये काँग्रेसचे प्रदीप राठोड सभापती तर बाळकृष्ण माने यांना उपभापतीचा मान मिळाला. औशामध्ये सभापतिपदी काँग्रेसच्या कोमल सूर्यवंशी तर उपसभापती म्हणून राष्ट्रवादीचे दिनकर मुगळे विजयी झाले. जळकोट पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वनमाला फुलारी तर उपसभापतिपदी भारत मालसुरे बिनविरोध निवडले गेले. चाकूरमध्ये राष्ट्रवादीचे करीम गुळवे तर काँग्रेसच्या शिल्पा कल्याणी यांची अनुक्रमे सभापती व उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाली. शिरूर अनंतपाळमध्ये भाजपच्या मीरा कांबळे या सभापती तर सेनेच्या
संगीता जाधव उपसभापती झाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणीत वर्चस्व
प्रतिनिधी | परभणी
जिल्ह्यातील चार समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळविले. शिवसेनेने दोन ठिकाणी स्थानिक समीकरणे जुळवित सभापतिपदे पटकावली.
परभणी पंचायत समितीवर सभापतिपदी शिवसेनेच्या नीलावती बाबूराव गमे, तर उपसभापतिपदी राजेंद्र अण्णासाहेब गमे यांची निवड झाली. सेलूत सभापतिपदी शिवसेनेच्या बायनाबाई लोखंडे यांची तर राष्ट्रवादी काॅँग्रेसचे संतोष डख यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली. गंगाखेडमध्ये सभापतिपदी उद्धवराव कदम तर उपसभापतिपदी मंजूषा जामगे या दोघाही अपक्षांची वर्णी लागली. सोनपेठमध्ये सभापतिपदी राष्ट्रवादीच्या छाया दत्तात्रय शिंगाडे यांची तर उपसभापतिपदी मदनराव भोसले यांची बिनविरोध निवड झाली. पाथरी समितीवर राष्ट्रवादीने वर्चस्व कायम राखले. सभापतिपदी राष्ट्रवादीचे तुकाराम जोगदंड तर उपसभापती राष्ट्रवादीचेच डॉ.बाळासाहेब घोक्षे हे विराजमान झाले. पालम पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाने वर्चस्व स्थापित केले. सभापतिपदी राष्ट्रवादीचे अॅड.विजयकुमार शिंदे तर शेकापच्या चित्रकला हत्तीअंभीरे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली.