आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीतील भक्त निवासाचे काम अंतिम टप्प्यात, 46 कोटी रुपये खर्च अपेक्षित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - येथील श्री विठ्ठल  रुक्मिणी मंदिर  समितीच्या वतीने सुमारे ४६  कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या भक्त निवासाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अतिशय देखण्या अशा या वास्तुमुळे पंढरपूरच्या वैभवात निश्चित भर पडणार असून भाविकांच्या निवासाची उत्तम व्यवस्था  या निवासात होणार आहे. येत्या आषाढीपूर्वी भाविकांच्या सेवेत ते आणण्याचा मंदिर प्रशासनाचा प्रयत्न अाहे. या निवासाचे काम सध्या रात्रंदिवस सुरू आहे. 
 
भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समितीच्या स्वनिधीतून तब्बल ४६ कोटी रुपये खर्चून नवीन भक्त निवास बांधण्यात येत आहे. श्री संत गजानन महाराज मठाच्या पिछाडीस भक्ती मार्गालगत सर्व्हे नं. ५९ मधील सहा एकर जागेत या भक्त निवासाचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पंढरपूर अर्बन बँकेच्या प्रशासकीय भवनाप्रमाणेच या नव्या भक्त निवासामुळे पंढरीनगरीच्या वैभवात निश्चित भर पडणार आहे. 
 
 या नवीन भक्त निवासामध्ये दोन बेडच्या १२९ खोल्या, आठ बेडच्या ७८ डॉर्मिटरीज, पाच बेडच्या तीन खोल्या व १५ सूट अशा एकूण २२५ खोल्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. याशिवाय एकावेळी दोनशे भाविक भोजन करू शकतील असा प्रशस्त डायनिंग हॉल, बाहेरील बाजूस ३४ व्यापारी गाळे, कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी १२ व कार्यालयीन कामकाजासाठी १६ खोल्या असे नियोजन करून या भक्त निवासाचे बांधकाम करण्यात येत आहे. 
 
अर्धवट भक्तनिवासाचे काम पूर्ण करावे : एम.टी.डी.सीचे भाडेतत्त्वावरील तसेच व्हिडिओकॉन आणि वेदांत या शिवाय राज्यातील आमदारांच्या फंडातून एक भक्त निवास बांधले जात आहे. त्या कामासाठी आवश्यक तेवढा निधी न मिळाल्याने त्या भक्त निवासाचे काम गेल्या पाच ते सात वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. या अर्धवट भक्त निवासाचे काम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आपल्या स्वनिधीतून पूर्ण करावे, अशी मागणी भाविकांमधून होत आहे. 
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी म्हणतात...: सुमारे ४६ कोटी खूर्चन बांधण्यात येणाऱ्या भक्त निवासाचे काम प्रगतिपथावर अाहे. येत्या आषाढीपूर्वी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
 
भक्तांच्या सोयीसाठी तीन भक्त निवास
श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या निवासाची सोय व्हावी यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) भक्त निवास भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतले आहे. या शिवाय व्हिडिओकॉन आणि वेदांत या संस्थांनी प्रत्येकी एक या प्रमाणे दोन भक्त निवास मंदिर समितीला बांधून दिलेली आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...