आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळीत फुटला प्रचाराचा नारळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - पंडितअण्णा मुंडे व कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जागविण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होईल. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत परिवर्तनाची लढाई परळीपासून सुरू झाली आहे. परळीतूनच या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडून प्रारंभ झाला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी सांगितले.
परळी वैजनाथ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री प्रकाश सोळंके, जिल्हाध्यक्ष अशोक डक यांची उपस्थितीत पंडितअण्णा मुंडे यांनी कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी पिचड यांनी राज्यातील 27 जिल्हा परिषद, 54 पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फुटल्याचे जाहीर केले. आम्ही भावनेचं राजकारण कधीच करत नाहीत. दुर्दैवानं 1995 मध्ये सत्तेत आलेल्यांनी केवळ घोषणाबाजीच केली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना बदनाम करण्याचं काम केलं. पंडितअण्णांसारखंच उभ्या महाराष्ट्राला फसविलं. म्हणूनच सत्ता गेली. विकास हेच राष्ट्रवादी काँग्रेसचं सूत्र आहे. पंडितअण्णांमुळे आज बर्‍याच बाबी आम्हाला माहीत झाल्या आहेत. यापुढं आम्ही सावध राहू, असे पिचड यांनी सांगितले.
अनुभव उपयोगी पडेल - परळीनं अनेक लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला स्थापनेपासूनच साथ दिलेली आहे. पंडितअण्णा मुंडे आता आमच्या पक्षात आले आहेत. 44 वर्षांतील चिमटे, चाली, खोड्यांचा त्यांचा दांडगा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपयोगी पडेल. गहिनीनाथ गडावरील पाणीप्रश्न तीस वर्षांपासून प्रलंबित होता. आ.सुरेश धस, गडाचे महंत विठ्ठल महाराज पाठपुरावा करत होते. त्यास सरकारने खास बाब म्हणून मंजुरी दिली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू आहे. आऊटगोइंग बंद आहे.’’ - जयदत्त क्षीरसागर, पालकमंत्री
कार्यकर्त्यांचा प्रवेश - ज्येष्ठ नेते पंडितअण्णा मुंडे, जिल्हा परिषद सदस्य बजरंग सोनवणे, सुचित्रा अजित देशमुख, अप्पा राख, अविनाश नाईकवाडे, नारायण शिंदे आदींसह सरपंच,सेवा संस्थांच्या अध्यक्षांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.