आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panditanna Munde In Ncp Ajit Pawar Dinner At Dhanajay Munde House

अजितदादांचे भोजन धनंजय मुंडेंच्या घरी! , पंडितअण्णा आज राष्ट्रवादीत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे थोरले बंधू पंडितअण्णा मुंडे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी परळीत येणारे पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपचे बंडखोर आमदार धनंजय मुंडे यांच्या घरीच दुपारचे भोजन करणार आहेत.
पंडितअण्णा यांच्यासोबत जि. प. सदस्य बजरंग सोनवणे, अमित उजगरे, सुचित्रा अजित देशमुख, पं.स. सभापती अ‍ॅड. गोविंद फड, मुरलीधर ढाकणे, अविनाश नाईकवाडे, सुरेशअप्पा राख, नारायण शिंदे हे गोपीनाथरावांची साथ सोडणार आहेत.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते परळीत येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस फुलचंद कराड यांच्या निवासस्थानी चहापान करून कार्यक्रमस्थळी जातील. कार्यक्रमानंतर आमदार धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ते दुपारचे भोजन घेणार आहेत.
आमदारकी सोडा, मग राष्ट्रवादीत जा; भाजपने ठणकावले
बाजार समितीतही ‘धनंजय’च!, परळीत सभापतिपदी पंडितराव मुंडे बिनविरोध
घराणेशाहीत गैर ते काय? गोपीनाथ मुंडे यांचा बेधडक सवाल!