आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानिपत केल्याशिवाय राहणार नाही - पंडितअण्णा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - आमची लढाई खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात नाही. ज्यांनी फोडाफोडी केली, त्यांना धडा शिकवणार आहोत; परंतु खासदार मुंडे मला संपवण्याची भाषा करतात. ते काय संपवणार, त्यांचं पानिपत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ज्येष्ठ नेते पंडितअण्णा मुंडे यांनी गुरुवारी येथे दिला.
पंडितअण्णा मुंडे यांनी आपल्या समर्थकांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या वेळी ते बोलत होते. 1969 पासून घराचा पालक म्हणून स्वत:चे शिक्षण अर्धवट सोडले आणि खासदार मुंडेंना मोठं केलं. त्यांना आमदार, खासदार केलं. एकदा पराभूत झाले तर मुंबईला जाण्याचे ठरवले; परंतु संरक्षण देत त्यांना परळीला घेऊन आलो आणि दुसºया निवडणुकीत विजयी केलं. आम्हाला त्यांनी काहीच दिलेलं नाही. त्यांच्यासाठी चाळीस वर्षे राबलो. खासदार मुंडे भगवान गडावर बोलेपर्यंत मी शांतच होतो. आम्हाला संपवण्याची भाषा त्यांनी करू नये. त्यांच्यात हिंमत असेल तर माझा पराभव करून दाखवावा. आम्ही त्यांचे पानिपत केल्याशिवाय राहणार नाही. ऊसउत्पादक शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी वैद्यनाथ कारखान्याच्या गव्हाणीत उडी मारीन ! खासदार मुंडेंचा सर्वच संस्थांमध्ये पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पंडितअण्णांनी या वेळी दिला.