आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवार राजकारणातील दिलीपकुमार तर पंकजा मराठीतील दीपिका पदुकोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विचार व्‍यक्‍त करताना शरद पवार आणि पंकजा मुंडे - Divya Marathi
विचार व्‍यक्‍त करताना शरद पवार आणि पंकजा मुंडे

लातूर - ''शरद पवार हे महाराष्‍ट्रातील ज्‍येष्‍ठ नेते आहेत. ज्‍या प्रमाणे सिनेसृष्‍टीत दिलीपकुमार यांना स्‍थान आहे त्‍याच प्रमाणे पवार यांना राजकारणात स्‍थान आहे. त्‍यामुळे ते राजकारणातील दिलीपकुमारच आहेत'', अशा शब्‍दांत राज्‍याच्‍या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पवार यांचे कौतुक केले. दरम्‍यान, त्‍यांच्‍या या कौतुकाला उत्‍तर देताना पवार म्‍हणाले, ''पंकजा या मराठीतील दीपिका पदुकोन आहेत''. शहरातील जिल्हा परिषद प्रांगणात उभारण्यात आलेल्या माजी मुख्‍यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे आज (शनिवार) अनावरण करण्‍यात आले. या कार्यक्रमात हा स्‍तुतीसुमनाचा कार्यक्रमत रंगला. कार्यक्रमाला खासदार सुनील गायकवाड आणि आमदार अमित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढील स्‍लाइड्वर वाचा नेमक्‍या काय म्‍हणाल्‍या पंकजा ?