आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचारमुक्त देश निर्माण करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय धाडसी : पंकजा मुंडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - सर्वसामान्य माणसाच्या जीवनात चांगले दिवस यावेत याकरिता केंद्रातील व राज्यातील भाजपचे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्टपणे काम करीत असून भ्रष्टाचारमुक्त देश निर्माण करण्यासाठी नोटाबंदीचा धाडसी निर्णय मोदी यांनी घेतल्यामुळे देशात मोठी अर्थक्रांती झाल्याचे उद्गार ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी काढले.

नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या भाजप उमेदवारांच्या व नगराध्यक्षपदाचे उमेदवार लक्ष्मीबाई कागणे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ भाजप नेते राम सावकार मुत्तेपवार तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोहा-कंधार मतदारसंघाचे प्रमुख मुक्तेश्वर धोंडगे, ज्येष्ठ भाजप नेते केरू सावकार बिडवई, देविदास राठोड, भाजपचे तालुकाध्यक्ष बाबुराव कागणे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार लक्ष्मीबाई कागणे, शिवा नरंगले, माधव मुसळे, उत्तम चव्हाण, शहर अध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार, माधव मुंडे यांच्यासह शहरातील सर्व प्रभागांतील भाजपचे उमेदवार उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित जनतेस मार्गदर्शन करताना मुंडे म्हणाल्या की, सर्वसामान्य गरीब
कुटुंबातील चहा विकून त्यांचा उदरनिर्वाह करणाऱ्या, कुठलाच राजकीय वारसा नसणाऱ्या नरेंद्र मोदींसारख्या सामान्य व्यक्तीस देशातील सर्वोच्च पदावर नेऊन ठेवण्याचे ऐतिहासिक कामगिरी देशातील बहाद्दर मायबाप जनतेने केली असून, ही भारताच्या इतिहासातील एक वेगळी क्रांतीच म्हणावी लागेल. सर्वसामान्यांच्या जीवनात आज एक आशेचा किरण निर्माण करण्यासाठी मोदींनी अनेक योजना निर्माण केल्या. हागणदारीमुक्त शहरे निर्माण व्हावीत याकरिता केंद्रातील व राज्यातील भाजपचे सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असून हागणदारीमुक्तीकरिता हजारो कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले.
कंधार शहरातील ऐतिहासिक बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचे महापाप माजी नगराध्यक्ष अरविंदराव नळगे व विद्यमान आमदार प्रतापराव चिखलीकर (लोकभारतीचा झेंडा हातात घेऊन) यांनी केले असून कंधार येथे भव्य व्यापारी संकुल व्हावे याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १२ कोटी रुपयांचा निधी कंधार नगर परिषदेसाठी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रचारात नोटाबंदीच्या मुद्द्याचे समर्थन
सध्या पालिका निवडणूक सुरू असून विरोधकांनी केंद्रशासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयावर रान उठवले असले तरी सत्ताधारी मात्र प्रचारात नोटाबंदीचे समर्थन करून सामान्यांना धीर देताना सर्वत्र दिसून येत आहेत. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनीही नोटाबंदीचा पंतप्रधान मोदींचा निर्णय धाडसी असल्याचे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...