आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pankaja Munde And Dhananjay Munde Clasesh In Beed

पंकजा, धनंजय यांच्यात शाब्दिक चकमक, वैद्यनाथचा कर्मचारी निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - वृद्ध मतदार महिलेचे दर्शन घेतल्याच्या कारणावरून भाजपच्या कार्यकर्त्यास राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने मारहाण केल्याची घटना परळी शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मतदान केंद्रावर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली. हा प्रकार कळल्यांनतर घटनास्थळी आलेल्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली.

परळी शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेत सकाळी साडेनऊ वाजता भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत वाद होऊन हाणामारी झाली. ही माहिती मिळाल्यांनतर त्या ठिकाणी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे समोरासमोर आले. कार्यकर्त्यास का मारहाण करण्यात आली, या कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. मतदान केंद्राच्या परिसरात वाद घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. हाणामारीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शरद मुंडे जखमी झाले.

वैद्यनाथचा कर्मचारी निलंबित
वैद्यनाथकारखान्याच्या निवडणुकीत मतदान केंद्रावर मतदान प्रतिनिधी म्हणून काम करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारखान्याचे कर्मचारी सर्जेराव नामदेव आपेट (रा. गिरवली) यांना निलंबित केले. आपेट हे अंबाजोगाई तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर उमेदवार अॅड.यशश्री मुंडे यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. त्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी कांबळे यांनी त्यांना निलंबित केले.

८२% मतदान, उद्या मोजणी
वीसजागांसाठी एकूण ८४०९ पैकी ६९२३ जणांनी मतदान केले, याची टक्केवारी ८२.३२ होते. परळी तहसील कार्यालयात मंगळवारी सकाळी नऊपासून वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी होणार आहे. मतमाेजणीसाठी दहा टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी महसूल विभागाचे १०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दोन दंगल नियंत्रक पथके, परळी शहर ग्रामीणबरोबरच जिल्ह्यातील दोनशे पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.