आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचा 70 हजार कोटींचा घोळ; भाजपने कमी वेळेत व खर्चात साठवले पाणी: पंकजा मुंडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - राज्यात सिंचनासाठी मागील सरकारने सत्तर हजार कोटी रुपये खर्च केले. मात्र त्यात पाणी साचलेच नाही, राज्य पाण्याविना कोरडेच राहिले. याउलट भाजप सरकारने कमी वेळात व कमी खर्चात पाणी साठविण्याचे काम करून सिंचनाचे क्षेत्र वाढविले, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी (दि.१३) केले.  

गंगाखेड तालुक्यातील कोद्री जिल्हा परिषद गटातील भाजप उमेदवार राजाभाऊ फड यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. या वेळी रासपाचे अध्यक्ष तथा दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, उद्योगपती रत्नाकर गुट्टे, भाजप जिल्हाध्यक्ष अभय चाटे, उमेदवार राजाभाऊ फड यांची उपस्थिती होती.  

मुंडे म्हणाल्या, स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे कार्य मी पुढे नेत आहे. माझ्यावर चांगले संस्कार झाले असल्याने मी उलटसुलट बोलत नाही. मुंडे साहेब हयात नसताना त्यांच्या पश्चात खोटी माहिती अजित पवार यांना देऊन साध्य काय करायचे आहे, असा सवाल करीत मुंडे साहेबांनी कधीही नाती तोडली नाहीत तर नाती वाढवली आहेत, असाही  टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना त्यांनी लगावला. कोद्री परिसरातील शेतकऱ्यांसाठी सिंचन क्षेत्र वाढावे, यासाठी राज्य सरकारच्या वतीने कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. विकासाच्या कामात राज्य सरकार अग्रेसर असल्याने आगामी काळात सिंचनासह रस्ते व आरोग्याच्या प्रश्नांवर काम मोठ्या प्रमाणात होईल. जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवून या भागाचा विकास करण्यासाठी मतदारांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन पंकजा मुंडे यांनी या वेळी केले. 
 
बातम्या आणखी आहेत...