आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुसर्‍यांदा अनाथ झाले, ऑडिओ क्लिपद्वारे बदनामीचा प्रयत्न, पंकजाताईंनी व्यक्त केली भावना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड/अहमदनगर- भगवानगडावरील दसरा मेळाव्यात राजकीय भाषण करण्यास महंत नामदेवशास्त्री यांनी बंदी घातल्यामुळे मंत्री पंकजा मुंडे व सानप समर्थकांत कमालीचा तणाव निर्माण झाला अाहे. या पार्श्वभूमीवर अनेक अाराेप-प्रत्याराेपांच्या फैरी झडत असताना पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बाेलताना मांडलेली भूमिका त्यांच्याच शब्दांत...
‘भगवानगडावर येण्यासाठी मला का नाकारलं जातंय यामागची कारणे शोधण्याचा मी प्रयत्न केलेला नाही. मी भगवानबाबांना मानते आणि दसऱ्याच्या दिवशी भगवानगडावर जाऊन त्यांचे दर्शन मी घेणारच अाहे. तिथे जमलेल्या हजाराे बांधवांना संबाेधित करायलाही मला अावडेल. कुणाला त्रास देण्यासाठी किंवा विरोध करण्यासाठी मी गडावर जात नाहीये. मी एक जबाबदार मंत्री असून एक भक्त या नात्याने मंगळवारी तिथे जाणार आहे. त्यामुळे माझ्या जाण्याने तिथे काही वाद हाेण्याचा प्रश्नच उद‌्भवत नाही. असे असले तरी गडावरील कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी माझी नसून ती पोलिस आणि प्रशासनाची आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या अाॅडिअाे क्लिपमध्ये माझे संवाद माेडूनताेडून जाेडण्यात अालेले अाहेत. माझी बदनामी करण्यासाठी हे प्रयत्न केले जात अाहेत. यामागे काेणाचा हात अाहे हे खरे म्हणजे अातापर्यंत लाेकांना कळलेही असेल किंवा याेग्य वेळी ते कळेलही.’

वन विभागाने नाकारली परवानगी...
भगवानगडासमोरील जागेतही मेळावा घेण्यास वन विभागाने परवानगी नाकारली आहे. वन विभागाच्या जागेत इतर उपक्रम करता येत नाहीत, असा सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्याने ही परवानगी नाकारण्यात आल्याचे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहेे.

पुढील स्लाइडवर वाचा, भगवानगडावर मोठा फौजफाटा तैनात, तणावाचे सावट कायम
बातम्या आणखी आहेत...