आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंकजा मुंडे, दानवेंना धक्का; राणे, चव्हाणांचा गड अाला, ‘सिंह’ गेला!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
-ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (परळी), पाणीपुरवठा मंत्री बबनराव लाेणीकर (परतूर) व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (भाेकरदन) हे भाजपचे ज्येष्ठ नेते अापापल्या गावच्या पालिका ताब्यात घेण्यात अपयशी.
- नारायण राणे यांचे सावंतवाडीवर वर्चस्व, नगराध्यक्षपद मात्र भाजपकडे. देवगडमध्ये काॅंग्रेसचा विजय.
- अलिबागमध्ये शेकापने सर्वच १७ जागा मिळवल्या. जयंत पाटलांचे वर्चस्व कायम
- साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भाेसले यांचे अध्यक्षपदासह वर्चस्व. विकास अाघाडीला २२ तर शिवेंद्रराजे नगरविकास आघाडीला १२ जागा.
- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराडमध्ये काॅंग्रेसला २९ पैकी १६ जागा. नगराध्यक्षपद मात्र भाजपकडे.
- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राखला राेह्याचा (जि. रायगड) गड. बंडखाेर पुतण्या, शिवसेना उमेदवार संदीप तटकरे पराभूत.
- नाशिक जिल्ह्यातील सहापैकी चार पालिकात शिवसेनेचे नगराध्यक्ष. भुजबळांच्या येवल्यातही अध्यक्षपद भाजपकडे.
- सांगाेल्यात (जि. साेलापूर) शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुखांना धक्का. नगराध्यक्षपद युतीकडे.
- शिर्डी नगर पंचायत काॅंग्रेसकडे राखण्यात राधाकृष्ण विखे पाटलांना यश. राहता पालिकेत मात्र नगराध्यक्षपद भाजपकडे.
- राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अार. अार. पाटील यांच्या तासगावमध्ये बहूमतासह भाजपचा नगराध्यक्ष.
बातम्या आणखी आहेत...