आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियाने धारेवर धरताच पंकजा म्हणाल्या- हौसेसाठी फोटो काढले नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रामविकासमंत्री आणि लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना मांजरा नदीपात्रावर सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी टिपलेल्या सेल्फीने त्यांना नव्या वादात ओढले आहे. - Divya Marathi
ग्रामविकासमंत्री आणि लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना मांजरा नदीपात्रावर सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी टिपलेल्या सेल्फीने त्यांना नव्या वादात ओढले आहे.
मुंबई - दुष्काळामुळे कोरड्या पडलेल्या लातूरच्या मांजरा नदीपात्रातील गाळ उपसा व बंधाऱ्यांच्या कामांची पाहणी केल्यानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी सेल्फी काढल्याने एकच वादळ उठले आहे. विरोधक व शिवसेनेनेही त्यावर टीका केली. पंकजांनी स्वत:च आपल्या ट्विटर अकाउंंटवर ही सेल्फी पोस्ट करून हा वाद ओढवून घेतला आहे.

दुष्काळग्रस्त भागात जाऊन एक मंत्रीच सेल्फी टिपतो ही बाब दुर्दैवी आहे. अशा प्रसंगी सेल्फीचा मोह टाळायला हवा, अशा शब्दांत शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी टीका केली. पंकजा मुंडेंनी जखमेवर मीठ चोळायचे काम केले आहे. आधी बिअर कंपन्यांना पाठिंबा दिला आणि आता सेल्फी काढली. आता त्या पुढे काय करणार आहात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे. सोशल मीडियावर सामान्य लोकांकडूनही पंकजांवर टीकेची झोड उठली आहे. ‘दुष्काळ असताना पंकजा असे फोटो कसे काढू शकतात? पंकजांचा या फोटोंसाठी सत्कारच केला पाहिजे, अशी उपहासात्मक टीकाही त्यांच्यावर करण्यात आली.
खडसेंकडून पाठराखण
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मात्र पंकजांची पाठराखण केली आहे. खडसेंच्या हेलीपॅडसाठी हजारो लिटर पाणी खर्च झाल्याने आधीच ते टीकेचे धनी झाले होते. त्यातच भाजपचा दुसरा कॅबिनेटमंत्री ऐन दुष्काळात वादाच्या गर्तेत अडकल्याने खडसेंंनी पंकजाची पाठराखणच करणे पसंत केले. सेल्फी प्रकरणाला एवढे महत्व देण्याचे कारण नाही. उगाचच पराचा कावळा करण्याचा हा प्रकार आहे, अशी भलामण खडसेंनी केली.
कॅबिनेटलाही दांडी
पंकजा सोमवारच्या कॅबिनेट बैठकीलाही हजर नव्हत्या. वैद्यकीय कारणामुळे आपण मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहू शकत नाही, असे कारण जरी त्यांनी िदले असले तरी त्यांच्या गैरहजरीमागे सेल्फी वाद असल्याचे बाेलले जाते. िबअर कंपन्यांना दुष्काळातही नेहमीसारखे पाणी देण्याचे जाहीर वक्तव्य करून पंकजा यांनी आधीच रोष ओढवून घेतला होता.कॅबिनेटमध्ये या प्रकारांवरून जाब विचारला जाण्याची शक्यता होती.
काय घडले होते
जलयुक्त शिवार योजनेची पाहाणी करताना मंत्री पंकजा मुंडेंनी सेल्फी घेतली आणि ट्विटर अकाउंटवर हे फोटो शेअर केले. त्यावरुन सोशल मीडियासह विरोधकांनी मंत्री मुंडेवर निशाणा साधला होता.
असंवेदनशीलता : विखे
भाजपचे मंत्री दुष्काळाबाबत किती संवेदनशील आहेत? सार्वजनिक िठकाणी भान ठेवायचे असते, ही साधी गोष्टही पंकजा यांना कळत नसेल तर सरकार कुठल्या िदशेने चालले आहे, हे िदसून येते, असे राधाकृष्ण िवखे पाटील म्हणाले.

हौस म्हणून फोटो नाही काढला - पंकजा मुंडे
सोमवारी सकाळपासून सेल्फीमुळे टीकेच्या धनी झालेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दुपारी स्पष्टीकरण दिले. हौस म्हणून फोटो काढला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
- पंकजा मुंडे म्हणाल्या, 'दुष्काळाने होरपळत असलेल्या रखरखीत भागात पाणी दिसल्याने फोटो काढला.'
- 'माझ्या खात्याने केलेल्या कामाला यश आल्यामुळे फोटो काढला.'
- मुंडेंनी, 'हा फोटो माझ्या खात्याच्या कामाचा होता', अशी पुस्तीही जोडली.
मंत्र्यांच्या हेलिपॅडसाठी 10 हजार लिटरची नासाडी
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच राज्याचे महसुल मंत्री आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी लातूरमध्ये हेलिपॅड तयार करण्यात आला होता. त्यासाठी 10 हजार लिटर पाण्याची नासाडी झाली होती. ही घटना ताजी असताना पंकजा मुंडेंनी घेतलेला सेल्फी दुष्काळग्रस्तांची थट्टा आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. राज्यकर्त्यांकडे संवदेनशीलता उरली नसल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणाले.
कशासाठी गेल्या आणि काय करुन बसल्या पंकजा मुंडे
- राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे रविवारी पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या लातूरच्या दौऱ्यावर होत्या.
- यावेली त्या लातूरमधील केसाई गावात पोहोचल्या. येथील जलयुक्त शिवार कामाची पाहाणी करताना त्यांना सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.
- येथे मांजरा नदीमधील पाणी पातळी खालावल्याने गाळ उपसण्याचे काम सुरु होते.
- येथे कामाच्या पार्श्वभूमीवर सेल्फी घेण्याचा मोह पंकजाताईंना झाला. यावेळी अधिकाऱ्यांनांही त्यांच्यासोबत फोटो घेण्यात धन्यता वाटत होती, असे काहींनी सांगितले.
- पंकजांचा दौरा दुरदर्शनची टीम कव्हर करत होती. त्यांचे कॅमेरेही त्यांच्यावरच रोखलेले होते.
- कामची पाहाणी केल्यानंतर मुंडे म्हणाल्या, जलयुक्त शिवारचे काम चांगले सुरु आहे. मी माझ्या मोबाईलवर सर्व रेकॉर्ड केले आहे.
दुष्काळ आणि पंकजा मुंडे
पंकजा मुंडे या लातूर आणि बीड या दुष्काळी भागाच्या पालकमंत्री आहेत. या भागाला रेल्वेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून या भागात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी मुंडे लातूरला गेल्या होत्या.
पंकजा मुंडे आणि वाद
- औरंगाबादमधील मद्यनिर्मीती कारखान्यांना पाणी पुरवठा करण्यावरुन शेतकरी संतप्त झाले असताना मुंडेंनी मद्यनिर्मीती कारखानदारांची बाजू लावून धरली होती.
- या प्रकरणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी प्रथम पिण्यासाठी असल्याचे सांगितले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा,
>> पंकजा मुंडेंच्या सेल्फीत आणखी कोण होते... सेल्फी फोटो ट्विटरवर टाकताना काय म्हणाल्या पंकजा मुंडे....
बातम्या आणखी आहेत...