Home »Maharashtra »Marathwada »Other Marathwada» Pankaja Munde In Savargaon

मला अडचणीत आणण्याचे राजकारण; पंकजा मुंडेंचा विरोधकांवर निशाणा

दिव्य मराठी वेब टीम | Aug 13, 2017, 09:20 AM IST

  • मला अडचणीत आणण्याचे राजकारण; पंकजा मुंडेंचा विरोधकांवर निशाणा
बीड- मला अडचणीत आणण्यासाठी घाणेरडं राजकारण केलं जात आहे. पण मला काहीही व्हायचं नाही. तुमच्या मनातलं जे स्थान आहे ते कायम राहू द्या, या शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या विरोधकांवर निशाणा साधला. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे असं सांगून हे राजकारण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
संत भगवान बाबा यांच्या जयंती सोहळा
बीड जिल्ह्यातील सावरगावात त्या बोलत होत्या. संत भगवान बाबा यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त त्या सावरगावात आल्या होत्या. सावरगाव हे भगवान बाबा यांची जन्मभूमी आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच सावरगावात आल्या होत्या. मुख्यमंत्री ही माझ्या नावाला चिकटलेली गोष्ट आहे. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे, राजकारणात मी सध्या कुठे उभी आहे, कसं पुढे जायचं हे मला माहीती आहे. बाहेरचे लोक जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणतात तेव्हा काहीही वाटत नाही, त्याकडे दुर्लक्ष करते. पण माझ्या भुमीतले लोकं बोलतात तो माझा सन्मान असतो, असे त्यांनी नमूद केले.

Next Article

Recommended