आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pankaja Munde News In Marathi, BJP, Beed, Divya Marathi

राज्यात सत्ता महायुतीचीच,सूत्रे माझ्याकडे राहणार - पंकजा मुंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी वैजनाथ - गुणवत्तेच्या बळावर मला स्थान मिळवायचे आहे. परळी विधानसभा मतदारसंघ तुम्ही सांभाळा... मी राज्यभर फ‍िरते. मुंडे साहेबांमुळे मी राजकारणात आले. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मी जिवाचे रान करणार आहे. राज्यात महायुतीचीच सत्ता येणार असून सत्तेची सूत्रे माझ्याकडे येणार आहेत, अशा शब्दांत भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी मंगळवारी येथे भावना व्यक्त केल्या.

परळी शहरात मंगळवारी सायंकाळी आमदार पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेचे आगमन झाले. वैद्यनाथ महाविद्यालयात आलेली रॅली आझाद चौक, शिवाजी चौक या महत्त्वाच्या मार्गांवरून सात वाजता मोंढा मैदानावर पोहोचली. त्या ठिकाणी रॅलीचे रूपांतर सभेत झाले. मंचावर संघर्ष यात्रेचे समन्वयक सुजितसिंह ठाकूर, आमदार विनायक मेटे, आर. टी. देशमुख, डॉ. प्रीतम खाडे, यशश्री मुंडे, संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, अशोक सामत, अशोक जैन, जिवराज ढाकणे, प्रवीण घुगे, फुलचंद कराड, रमेश पोकळे आदी उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मला खंडणीबहाद्दर, कंत्राटदार व्हायचे नाही, बोगस बिले उचलणारे कार्यकर्ते पोसायचे नाहीत. एवढेच काय, मला डबके नव्हे तर िनखळ झरा व्हायचे आहे. अनुंकपा धर्तीवर मला प्रमोशन नको, गुणवत्तेवर प्रमोशन मिळवायचे आहे. मला आयत्या पिठावर रेघोट्या ओढायच्या नाहीत. मुंडे साहेबांसारखे कर्तृत्वान व्हायचे आहे.
कर्तृत्वाच्या व संघर्षाच्या बळावर राज्यात सत्तापरिवर्तन करायचे आहे. संघर्ष यात्रेला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत असून नागरिकांच्या या मायेमुळे मी आनंदी आहे.

बाबांविना इथे पहिली सभा
माझ्या बाबांनी ३५ वर्षे संघर्ष केला. त्यांना झालेल्या वेदना मी पाहलि्या आहेत. त्यांचे नाव जगाला विसरू देणार नाही. माझे कुटुंब हेच परळी मतदारसंघ आहे. आता कुठे चांगले दिवस आले होते; परंतु नियतीने आम्हाला चांगले दिवस पाहू दिले नाहीत. परळीतील ही पहिली सभा अशी असेल की सभेला मंुडेसाहेब नाहीत. फार मोठे दु:ख वाटते. मी घरात बसून रडण्याऐवजी साहेबांचे सत्तेचे स्वप्न साकार करण्यासाठी संषर्घ यात्रेच्या माध्यमातून दिवस-रात्र फिरत आहे, असे त्या म्हणाल्या.

... अश्रू अनावर झाले
दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी जनतेवर अलोट प्रेम केले. मी त्याहीपेक्षा अिधक प्रेम करून जनतेची मने िजंकेन, परळी राज्यभर गाजवेन, असा िनर्धार पंकजा यांनी केला. ज्या मोंढा मैदानावर तीन जून रोजी गोपीनाथ मुंडे यांची िवजयी सभा होणार होती, त्याच िठकाणी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनाला ठेवण्याचे िनयोजन झाले. तेथे तीन महिन्यांनी संघर्ष यात्रेची सभा झाली. घरच्या मैदानावर बोलायला उभे राहताच पंकजा यांना अश्रू अनावर झाले अन् मुंडेंच्या आठवणींनी काही क्षण सभास्थळ सुन्न झाले.

परळीतील प्रतिसादाबद्दल उत्सुकता
परळी मतदारसंघातून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल मला खूप उत्सुकता होती. सभेला जमलेला जनसमुदाय पाहून मुंडे साहेबांची आठवण येते. त्यांनी मागील विधानसभेत घेतलेला निर्णय योग्य होता, हे तुमच्याकडे पाहलि्यावर दिसते.जिल्ह्यात एमआयडीसी आणून युवकांना काम मिळवून द्यायचे आहे. जलि्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास करायचा असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.