आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pankaja Munde News In Marathi, Divya Marathi, Beed Lok Sabha Seat

बीडचा उमेदवार मुंडे कुटुंबातीलच, पंकजा मुंडे यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - बीड लोकसभा मतदारसंघाचा निर्णय माझ्याकडेच आहे. ही जागा मुंडे कुटुंबाकडेच राहावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. तो पाहता येथे मुंडे कुटुंबातीलच उमेदवार दिला जाईल, अशी माहिती आमदार पंकजा मुंडे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.

संघर्ष यात्रेनिमित्त आलेल्या पंकजा म्हणाल्या, बीडचा विषय कोअर कमिटीत नाही. काही जागांचे अधिकार मला आहेत. या जागेबाबत दोन दिवसांत ठरवू. पंकजा यांच्या बहीण डॉ. प्रीतम खाडे यांचे नाव या जागेसाठी पुढे येत आहे.