आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजीराजेंची बहीण झाले तर भीती वाटणार नाही, गाेपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - पंकजा मुंडे ही माझी बहीण आहे. गोपीनाथ मुंडे यांचा जनसेवेचा वारसा त्या समर्थपणे चालवत आहेत. राज्य सरकारमध्ये त्यांनी चांगल्या कामाचा ठसा उमटवला असल्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खा. संभाजीराजे भोसले म्हणाले. हाच धागा पकडून मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, बहीण म्हणून केलेला उल्लेख हा माझ्यासाठी प्रेरणा देणारा आहे. छत्रपती संभाजीराजे मला बहीण मानत असल्यास मला राज्यात कोणाचीच भीती वाटणार नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील गोपीनाथ गडावर सोमवारी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. जयंती दिन सामाजिक उत्थान दिवस म्हणून राबवण्यासाठी नियाेजन करण्यात आले होते. राजस्थान येथील ध्यानयोगी महंत उत्तम स्वामीजी महाराज, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, प्रवीण दरेकर यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांचा जनसेवेचा वारसा समर्थपणे चालवत आहेत. राज्य सरकारमध्ये त्यांनी चांगल्या कामाचा ठसा उमटवला असल्याचे ते म्हणाले. पंकजा मुंडे म्हणाल्या, छत्रपती संभाजीराजे यांनी दिलेले राज्याभिषेक सोहळ्यासाठीचे आमंत्रण आदरपूर्वक स्वीकारते व मी या वर्षी तेथे जाणार आहे. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष करून जे कमवलं तेच कार्य मीही करीत आहे.
बातम्या आणखी आहेत...