आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pankaja Munde's Panel Won In Dindayal Bank Election

दीनदयाळ बँकेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचे पॅनल विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत साेमवारी झालेल्या मतमोजणीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत पंकजा पालवे सर्वाधिक ३३०३ मते मिळवून विजयी झाल्या आहेत.

दीनदयाळ बँकेच्या १५ संचालकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ही बँक बिनविरोध काढण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रयत्न केले होते. यातील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून गाेविंद कुडके, ओबीसीमधून राजभाऊ दहिवाड, तर भटक्या विमुक्त जातीतून किसन पवार हे बिनविराेध निवडून आले होते. सर्वसाधारण गटाच्या दहा जागांसाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलने दहा उमेदवार, तर अपक्ष उमेदवार अशोक लोमटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महिला राखीव प्रवर्गातील दोन जागांसाठी पंकजा मुंडे व शरयू हेबाळकर यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार संगीता आपेट यांनी आव्हान दिले होते.