आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेवर आधारित उद्योग बीड जिल्ह्यात आणण्याची रेल्वेमंत्री प्रभूंकडे शिफारस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी- नगर-बीड-परळीरेल्वे मार्गाचे काम जलद गतीने सुरू अाहे. नगर ते नरायणडाेह मार्गापर्यंत असलेल्या रेल्वे रुळावरून इंजिन धावले अाहे. बीड ते परळीपर्यंत असलेले भूसंपादन अन्य कामे सुरू असून बीड जिल्ह्यात रेल्वेवर अाधारित उद्याेग अाणण्यासंदर्भाची शिफारस ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन केली अाहे. 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. आरोग्य शिबिर, अपंगांना साहित्य वाटप, गरजूंना मदत, महिला बचत गटांना व्यवसायासाठी कर्ज वाटप, शेतकऱ्यांना मदत आदी कार्यक्रमांमधून सामाजिक उत्थानाचे काम गडावर होते. यंदाही या कार्यक्रमास रेल्वेमंत्री प्रभू यांनी उपस्थित राहावे यासाठी साेमवारी (दि. २४) राेजी दिल्ली येथे जाऊन प्रत्यक्ष भेटून घेऊन त्यांना निमंत्रित केले. दरम्यान, परळी - बीड - नगर रेल्वेच्या सध्या सुरू असलेल्या कामाबाबत ग्रामविकास मंत्री मुंडे यांनी या भेटीत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या मार्गासाठी भरीव निधी देऊन रेल्वे मार्गाचे काम २०१९ पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामाला गती दिल्याबद्दल तसेच लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि जिल्हावासीयांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल त्यांनी रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले.
बातम्या आणखी आहेत...