आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटील कुटुंबाकडून काँग्रेस पक्ष हायजॅक, पापा माेदी यांचा अाराेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव- बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा केजच्या पाटील कुटुंबानीच हायजॅक केला आहे. ते स्वतः पुरताच पक्षाचा वापर करीत असल्याने कांॅग्रेस पक्षाची जिल्ह्यात दयनीय अवस्था झाली अाहे, असा आरोप अंबाजोगाई येथील काँग्रेसचेच नेते राजकिशाेर (पापा) मोदी यांनी साेमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

माजलगाव येथील मोरेश्वर जिनिंगच्या शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यासाठी माेदी हे सोमवारी माजलगावात आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना मोदी म्हणाले की, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून बीड जिल्ह्यात या पक्षाची धुरा केजचे अशोक व रजनी पाटील या दांपत्याकडे आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाचा उपयोग फक्त स्वतःच्या हितासाठी केला आहे. जिल्ह्यात पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी त्यांनी आजपर्यंत कोणतेच प्रयत्न केले नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून मी काँग्रेस पक्षात सक्रिय काम करत असताना अंबाजोगाई नगरपालिका निवडणुकीत मला आघाडी करावी लागली. केजच्या पाटील कुटुंबानी काँग्रेस पक्ष हायजॅक केला असल्यानेच जिल्ह्यात पक्षाची दयनीय अवस्था झाल्याचा आरोपही मोदी यांनी केला. या वेळी पणनचे संचालक अॅड. विष्णू सोळंके, सभापती नितीन नाईकनवरे उपस्थित होते.
जिल्ह्यात चर्चेला उधाण
पापा माेदी यांनी पाटील कुटुंबीयांवर केलेल्या अाराेपामुळे एकच खळबळ उडाली अाहे. पाटील दांपत्यावर या अाधी माजलगाव येथील एका पदाधिकाऱ्याने टीका केली हाेती, तर मागील काही वर्षांपासून राजकीय विळ्या-भाेपळ्याचे नाते असलेल्या अंबाजाेगाईतील माेदी यांनी टीका केल्याने चर्चेला उधाण अाले.