Home »Maharashtra »Marathwada »Other Marathwada» Parabhani Gram Panchayat Online

परभणीतील ७०४ ग्रा.पं. होणार ऑनलाइन

प्रतिनिधी | Aug 19, 2011, 07:02 AM IST

  • परभणीतील ७०४ ग्रा.पं. होणार ऑनलाइन

परभणी. पुढील दोन महिन्यांत जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायती ऑनलाइन होणार असून याकरिता संगणक तसेच इतर साहित्य खरेदी करण्यासाठी १३व्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना निधी मिळणार आहे. संगणकामध्ये ‘प्रिया’ नावाचे सॉफ्टवेअर टाकण्यात येणार असून याद्वारे आता ग्रामपंचायतीचा ऑनलाइन होतील.
केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्यात येते. एप्रिल २०१० पासून १३ व्या वित्त आयोगास प्रारंभ झाला आहे. या वित्त अयोगाचा कालखंड एप्रिल २०१० ते मार्च २०१५ असा राहणार आहे. या वित्त आयोगातून पाच कोटी ५८ लाख ६० हजार रुपयांचा निधी मिळणार असून यातील पहिला हप्ता जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. हा निधी पाच वर्षांत वार्षिक दोन टप्प्यांत मिळणार आहे. ऑनलाइन पद्धतीने प्रणाली सुरू करताना त्यामध्ये संगणक, इंटरनेट तसेच इतर बाबींचा समावेश राहणार आहे. प्रत्येक संगणकाचा खर्च ६० ते ७० हजार एवढा असू शकतो. जिल्ह्यात एकूण ७०४ ग्रामपंचायती असून यापैकी ७६ ग्रामपंचायतींनी संगणक खरेदी केले आहेत. हा सर्व ऑनलाइन कारभार ग्रामसेवक पाहणार आहेत. यासंदर्भात प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
६२८ ग्रा.पं.ला लवकरच निधी
जिल्ह्यातील ७६ ग्रामपंचायतींनी यापूर्वीच संगणक घेतले असून, त्यांना निधी देण्यात येणार आहे. लवकरच उर्वरित ६२८ ग्रामपंचायतींना संगणकासाठी निधी देण्यात येणार आहे. यासंदर्भात संगणक कंपनीशी करार झाला आहे.’’
अशोक शिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)

Next Article

Recommended