आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅव्हल्सच्या धडकेने परळीत दांपत्य ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - शहरालगत झालेल्या अपघातात दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. पाच वर्षांचा मुलगा मात्र सुखरूप आहे. ही घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली.
लातूर येथील व्यंकटेशनगरचे संजय त्र्यंबक सोरडे (34), पत्नी बालिका व मुलगा मनोज (पाच) हे तिघे दुचाकीने (एमएच 23 एसी 8547) परभणी जिल्ह्यातील पेडगाव येथे जात होते. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास परळी शहराजवळील अश्विनी हॉटेलसमोर अंबाजोगाईकडे जाणार्‍या ट्रॅव्हल्सने (एमएच 23 डब्ल्यू 3786) सोरडे दांपत्याच्या वाहनास धडक दिली. यात संजय व बालिका सोरडे यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने दोघेही जागीच ठार झाले. पाचवर्षीय मनोजही ट्रॅव्हल्सच्या खाली आला होता. परंतु दोन्ही चाकांमध्ये आल्याने त्याला मार लागला आहे.