आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ मुंडेंची फटकेबाजी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - परळीत थोरले बंधू पंडितअण्णा मुंडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी लातूर येथे पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार टोले लगावले. धनंजय मुंडे यांचाही त्यांनी तिखट शब्दांत समाचार घेतला.

मी संघर्षातून मोठा झालो आहे. जनतेची ताकद माझ्यामागे आहे. मला संपवण्यासाठी तीनदा जन्म घ्यावा लागेल.
दुसºयाच्या घराचे वासे मोजण्यापेक्षा अजित पवार यांनी आपल्या घरात काय जळते आहे ते पाहावे
पंडितअण्णांचा परिचय देताना त्यांनी भुषवलेली पदे सांगण्यासाठी 15 मिनिटे लागली. यावरून मी त्यांना काय दिले हे कळते.
धनंजयला मंत्रिपद हवे होते. त्यामुळेच तो पवारांच्या वळचणीला गेला. सत्तेची लालसा आणि स्वार्थासाठी हे पक्षांतर झाले आहे.
स्वत:ला इमानदार म्हणवून घेता आणि मग राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या व्यासपीठावर जाताच कसे ?
भाजपचे 5 टक्के लोक त्यांच्यासोबत गेले आहेत,
95 टक्के निष्ठावान कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत.

लातुरातील रुग्णालयात रात्र जागून काढली
गोपीनाथरावांचे धाकटे बंधू व्यंकट मुंडे यांच्यावर लातूर येथील प्लॅनेट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे गोपीनाथरावांनी बुधवारची रात्र रुग्णालयात जागून काढली. गुरुवारी बीड, गेवराईतील सभेला जाण्याचा पूर्वनियोजित कार्यक्रमही त्यांनी रद्द केला.