आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळीत पोलिसाचा खून, अनैतिक संबंधांतून हत्या झाल्याचा अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - येथील शहर ठाण्याचे पोलिस नाईक शेख मुस्तफा यांचा मृतदेह परळी शहरातील वखार महामंडळाजवळ आढळून आला. पोलिस अधीक्षकांनी सकाळी अकरा वाजता घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. मृतदेह स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
अहमदपूर तालुक्यातील काळेगाव येथील शेख मुस्तफा शेख यासीन सहाब (46) हे परळी शहर ठाण्यात पोलिस नाईक पदावर कार्यरत होते. सोमवारी ते कामावर नव्हते. शहरातील वखार महामंडळालगत एका व्यक्तीचे प्रेत आढळल्याची माहिती मंगळवारी सकाळी एका नागरिकाने पोलिसांना कळवली. सदरील प्रेत शेख मुस्तफाचे असल्याची ओळख पटली.
अंगावर फायटरचे वार
शेख मुस्तफा यांच्या अंगावर फायटरचे वार आढळून आले आहेत. मात्र त्यांच्या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी शहर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी संशयितांची चौकशी सुरू केली आहे.
दोन संशयितांना अटक
शेख मुस्तफा याला फायटरने मारहाण करण्यात आली. त्या परिसरात तो सोमवारी रात्री दारू पिण्यास गेला होता. या प्रकरणी संशयितांना अटक झाली आहे. हा प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याचा अंदाज आहे. नवीनचंद्र रेड्डी, पोलिस अधीक्षक, बीड