आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वैद्यनाथ’वर पंकजांचे एकहाती वर्चस्व; धनंजय गटाचा सफाया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - वैद्यनाथ साखर कारखान्यावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचेच वर्चस्व राहणार आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे वैद्यनाथ पॅनलने २० पैकी २० जागांवर दणदणीत विजय मिळवला. राजकारणात अालेल्या गाेपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या यशश्री यांनीही निवडणुकीत विजयी पदार्पण केले.

धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलचा धुव्वा उडाला. पांगरी ऊस उत्पादक गटातील भाजपचे त्रिंबक तांबडे, श्रीहरी मुंडे, ज्ञानोबा मुंडे विजयी झाले, तर धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलचे सूर्यभान मुंडे, गणपत मुंडे, श्रीकृष्ण मुंडे पराभूत झाले आहेत. नाथ्रा ऊस उत्पादक गटातील भाजपच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, नामदेव आघाव, भाऊसाहेब घोडके, अनुसूचित जाती गटातून गणपत संतराम घाेडके, अाेबीसी गटातून केशव रंगनाथ माळी फुलचंद येडबा कराड हे विजयी झाले. राष्ट्रवादीचे सतीश आचार्य, व्यंकट देशमुख, माधव मुंडे यांचा पराभव झाला. महिला राखीव गटातून गाेपीनाथ मुंडे यांच्या कन्या यशश्री जमुनाबाई सत्यनारायण लाहाेटी विजयी झाल्या. परळी ऊस उत्पादक गटातील भाजपचे दत्तात्रय देशमुख, पांडुरंग फड, महादेव मुंडे विजयी झाले आहेत, तर राष्ट्रवादीचे शिवाजी घोलप, प्रदीप देशमुख, बबन फड पराभूत झाले. सिरसाळा ऊस उत्पादक गटातून भाजपचे आश्रुबा काळे, आमदार आर. टी. देशमुख, किसन शिनगारे विजयी झाले, तर राष्ट्रवादीचे चंद्रकांत कराड, भाऊसाहेब नायबळ, चंद्रकांत सोनवणे पराभूत झाले. धर्मापुरी ऊस उत्पादक गटातून भाजपचे शिवाजी गुट्टे, विवेक पाटील, परमेश्वर फड विजयी झाले. राष्ट्रवादीचे अरुण गिते, वसंत धुमाळ, महादेव फड पाचव्या फेरीअखेर पराभूत झाले.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, विजयी उमेदवारांची यादी