आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Parali Thermal Power Plant News In Dovya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केवळ दोन संचांवरच परळीच्या थर्मलमधून वीजनिर्मिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - येथील औष्णिक वीज केंद्रातील पाच पैकी तीन संच बंद असून कोळशाच्या तुटवड्यामुळे येथील 250 मेगावॅट क्षमतेच्या दोन संचांवर सध्या कशीबशी वीजनिर्मिती होत आहे.

तीन महिन्यांपासून परळीतील औष्णिक वीज केंद्रात गरजेपेक्षा निम्माच कोळसा रेल्वेद्वारे येत आहे. कोळसा कमी पडला की आलटून पालटून संच बंद केल्याशिवाय पर्याय राहत नाही. तीन महिन्यांत तब्बल वीस वेळेस वेगवेगळे संच कोळशाअभावी बंद करावे लागले आहेत. चालू महिन्यात संच बंद करण्याची ही तिसरी वेळ आहे.

210 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक पाच 26 जूनला कोळशाअभावी बंद करावा लागला. तीनच दिवसांत 210 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक चार बंद पडला आहे. पाचपैकी केवळ दोनच संच सुरू आहेत. त्यातूनही पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होत नाही. राज्यातील चंद्रपूर, आंध्र प्रदेश, ओरिसा व कर्नाटकमधून येणारा कोळसा मागील तीन महिन्यांपासून कमी प्रमाणात येत असल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा फटका वीजनिर्मिती केंद्राला बसला आहे. पाचही संच पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी 18 हजार मेट्रिक टन कोळशाची गरज आहे, परंतु दररोज तीन ते सात हजार मेट्रिक टन कोळसा येत असल्याने संच बंद करावा लगत आहे. चालू असलेले 250 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक सहा व सातच्या परिसरात चोवीस तास पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे.

भारनियमनावर परिणाम
सतत बंद पडत असलेल्या संचाचा आर्थिक भार येथील वीजनिर्मिती केंद्रावर पडत असून बंद संच पुन्हा सुरूकरण्यासाठी किमान एक कोटी रुपयांचा खर्च येतो. राज्याच्या भारनियमनावर याचा विपरीत परिणाम होतो.