आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद धक्का: वर्षापासून बंद असलेले परळी औष्णिक केंद्राचे बॉयलर पेटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी- गेल्या १४ महिन्यांपासून बंद असलेल्या परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचे बॉयलर प्रदीपन शनिवारी करण्यात आले. त्यामुळे परळी येथून प्रतिनियुक्तीवर गेलेले कर्मचारी परतण्यास सुरुवात झाली आहे.

पाण्याच्या कमतरतेमुळे मागील १४ महिन्यांपासून परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्र बंद आहे. आता या वीज निर्मिती केंद्रासाठी जायकवाडी धरणातून डाव्या कालव्याद्वारे खडका बंधाऱ्यात पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे. या पाण्याचा विसर्ग सुरू असून खडका बंधाऱ्यात सोमवारपर्यंत पाणी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर परळी येथील वीज निर्मिती केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक सातचे बॉयलर प्रदीपन शनिवारी सकाळी ११ वाजता मुख्य अभियंता एल.बी.चौधरी यांच्या हस्ते बटण दाबून करण्यात आले. चौदा महिन्यांपासून बंद असलेला वीज निर्मिती केंद्राच्या धुराड्यातून शनिवारी पहिल्यांदाच धुराचा लोट बाहेर पडला.

चारसंच चालवणार
बंधाऱ्यातजायकवाडी धरणातून पाणी येण्यास सुरुवात झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक सहा, २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक पाच चार सुरू केला जाणार आहे. पाचपैकी चार संच चालविण्यात येणार आहेत, अशी माहिती वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता एल.बी.चौधरी यांनी दिली.

२१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन हा ३६ वर्षे जुना झाल्यामुळे कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता ९२० मेगावॅट क्षमतेचे उर्वरित चार संच सुरू होतील, असे सूत्रांनी सांगितले.

एक संच कायमस्वरूपी बंद
प्रत्यक्ष विद्युत निर्मितीला ७२ तास

शनिवारी २५० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक सातचे बॉयलर प्रदीपन करण्यात आले. बॉयलर प्रदीपन झाल्यानंतर प्रत्यक्ष वीजनिर्मितीला ७२ तासांचा अवधी लागतो. ज्या दिवशी खडका बंधाऱ्यात पाणी येईल, त्या दिवशी उर्वरित संच टप्प्याटप्प्याने सुरू केले.

प्रतिनियुक्तीवर गेलेले सहाशे कर्मचारी परतण्यास सुरुवात
परळी औष्णिक केंद्र बंद झाल्यानंतर जवळपास ६०० कर्मचारी प्रतिनियुक्तीवर इतरत्र गेले. आता संच सुरू होत असल्याने जशी आवश्यकता भासेल त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना बोलवले जात आहे. संच क्रमांक सात सुरू झाल्याने काही कर्मचारी परतले आहेत. शिवाय इतर ३५० गुत्तेदारांच्या माध्यमातून दोन हजार कंत्राटी कामगारांनाही रोजगाराचे साधन मिळणार आहे.

एकूण पाच संच
केंद्रात २१० मेगावॅट क्षमतेचे तीन संच आहेत, तर २५० मेगावॅट क्षमतेचे दोन संच आहेत. या पाचही संचांची एकूण क्षमता एक हजार १३० वॅट इतकी आहे. शनिवारी २५० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक सातचे बॉयलर प्रदीपन करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...