आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यनाथ बँक घोटाळा: 26 जणांवर गुन्हे दाखल, तत्कालीन चेअरमनसह २० संचालकांचा समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - येथील वैद्यनाथ बँकेकडून कर्ज वितरण व व्यवहारात संगनमत करून अार्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून बँकेच्या संचालक मंडळासह २६ जणांवर शनिवारी गुन्हा नोंदवला. यात बँकेच्या तत्कालीन चेअरमनसह २० संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, २ लेखा परीक्षक, २ विधी सल्लागार, मूल्यांकनकार यांचा समावेश आहे. या प्रकरणात गुन्हे दाखल करून चौकशी करावी, असे आदेश गुरुवारी न्यायदंडाधिकारी   एम.जे. डौवले यांनी  दिले होते.  
 
वैद्यनाथ बँकेच्या २०१२-१६  या काळातील चेअरमनसह सर्व संचालक मंडळ, बँकेचे लेखापरीक्षक, विधी सल्लागार, मूल्यांकनकार अशा एकूण २६  जणांवर कलम १५६ (३) फौजदारी अाचारसंहितेप्रमाणे गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी दाद बँकेचे सभासद सुभाष निर्मळ यांनी वकील दिलीप स्वामी यांच्यामार्फत १८ फेब्रुवारी २०१७ रोजी परळी न्यायालयात मागितली होती.
 
या प्रकरणी गुरुवारी न्यायालयाने  पोलिसांना गुन्हे दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार  विद्यमान  चेअरमन अशोक जैन, सोमनाथ हालगे, व्हाइस चेअरमन विनोद सामत, माजी चेअरमन विकासराव डुबे, विजयप्रकाश तोतला, नारायण सातपुते, डॉ. राजाराम मुंडे, पुरुषोत्तम भन्साळी, जयसिंग चव्हाण, नितीन कोटेचा, प्रवीण देशपांडे, दासू वाघमारे, अनिल तांदळे, रमेश कराड, प्रकाश जोशी, सुरेखा मेनकुदळे, डॉ. शालिनी कराड यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आर. बी. जाधव करत आहेत.

बँक ऑडिटर, सीएवरही गुन्हा
या प्रकरणात ऑडिटर मदनलाल जाजू, जगदीश मोदाणी, परळीचे शाखाधिकारी  विनोद खर्चे, मुख्य कार्यकारी अधिकारी महेशचंद्र कवठेकर, बँकचे सीए सुनील कोटेचा, राहुल बंग, विधी सल्लागार प्रकाश मराठे, राजेश्वर देशमुख, मूल्यांकन कन्सल्टंट एम. पी. देशपांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...